भाजपाचे नेते आणि राज्यामधील माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा विवाह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरेंसोबत होणार आहे. मुंबईमधील एका आलिशान हॉटेलमध्ये २८ डिसेंबर रोजी मोजक्या उपस्थितांच्या साक्षीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

अंकिता पाटील कोण आहेत?
अंकिता पाटील या सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्या काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून काम पाहतात. तसेच अंकिता या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या निर्देशक पदावर कार्यरत आहेत. अंकिता यांचे वडील हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणामधील महत्वाच्या नेत्यांपैकी एक नाव आहे. हर्षवर्धन यांनी २०१९ साली निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

निहार ठाकरे कोण?
निहार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. बाळासाहेबांचे दिवंगत पुत्र बिंदूमाधव ठाकरे हे निहार यांचे वडील. बिंदूमाधव यांचं १९९६ साली एका अपघातामध्ये निधन झालं. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे असणारे निहार हे मुंबईमधील एक प्रतिष्ठित वकील आहेत.

कशी झाली भेट?
अंकिता पाटील यांनी लंडनमधील हार्वर्ड विद्यापिठामध्ये एका वर्षाचा एका विशेष कोर्सचं शिक्षण घेतलं आहे. तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही त्यांनी शिक्षण घेतलं आहे. तर निहार ठाकरे यांनीही हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलं असून एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. हे शिक्षण घेत असतानाच अंकिता आणि निहार यांची ओळख झाल्याचं सांगितलं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरेंना आमंत्रण…
मंगळवारी हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासगी भेट घेऊन त्यांना या लग्नाचं विशेष आमंत्रण दिलं आहे.