राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. पत्रकार परिषदा, माध्यमांशी संवाद किंवा जाहीर सभांमधली भाषणं, या सर्व ठिकाणी अजित पवारांचा हा मिश्किल स्वभाव त्यांच्या टिप्पणींमधून समोर येत असतो. पुण्यात आज त्यांनी काही पदाधिकारी, गणेश मंडळांच्या घेतलेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी अशीच एक टिप्पणी केली. मात्र, ही टिप्पणी म्हणजे चंद्रकांत पाटलांचं कौतुक होतं की टोला? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

महाविकास आघाडीचं सरकार असताना अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते. यावेळी अजित पवार दर आठवड्याला पुण्यात प्रशासकीय अधिकारी व इतर नेतेमंडळींची बैठक घेऊन पुण्याशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायचे. शिवाय, यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यासंदर्भात माध्यमांनाही माहिती देत असत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या बैठकांची संख्या कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय दुसरीकडे पुण्याचे पालकमंत्री असणारे चंद्रकांत पाटील अजित पवारांप्रमाणे दर आठवड्याला बैठका घेत नसल्याची चर्चा आहे. यासंदर्भात अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी यावर मिश्किल टिप्पणी केली.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

काय म्हणाले अजित पवार?

“मी जर बैठक घेतली, तर मला असं वाटतं की मी घेतलेल्या बैठकीचा परिणाम सातच दिवस राहणार आहे. म्हणून मी पुढच्या आठवड्यात लगेच बैठक घेत असतो. पण काही लोकांना असं वाटतं की त्यांनी घेतलेल्या बैठकांचा परिणाम एक ते दोन महिने राहणार आहे. त्यामुळे ते एक ते दोन महिन्यांनंतर बैठका घेतात”, अशी टिप्पणी अजित पवारांनी केली. त्यांची ही टिप्पणी म्हणजे चंद्रकांत पाटील यांना टोला असल्याचं बोललं जात आहे.

पुण्याचे पालकमंत्री नक्की कोण?

“माझी बैठक घेण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही सगळे मिळून काम करत असतो. माझ्या ज्या सहकाऱ्यांना वेळ असेल, त्यांना मी नेहमी बैठकीला बोलवतो. माझ्या बैठकीला दिलीप वळसे पाटील वगैरे इतर मंत्री आलेच पाहिजेत असं असेल तर मी त्यांना बोलवीन”, असंही अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.

अजित पवार पुण्याचे सुपर पालकमंत्री?

दरम्यान, चंद्रकांत पाटील जरी पुण्याचे पालकमंत्री असले, तरी अजित पवारच त्यांच्यामागून पुण्याचे सुपर पालकमंत्री म्हणून काम पाहात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवारांनी त्यावर एका वाक्यात सूचक उत्तर दिलं. “तुझ्या तोंडात साखर पडो”, असं अजित पवार संबंधित पत्रकाराला उद्देशून म्हणाले. त्यामुळे अजित पवारांची ही टिप्पणी नेमकी चंद्रकांत पाटलांचं कौतुक होतं की टोला? यावर तर्क-वितर्क लावले जात आहेत.