कोपर्डी प्रकरणातील बचाव पक्षाचे वकील योहान मकासरे यांना अज्ञात व्यक्तींनी फोनवरुन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोपर्डीत जुलै २०१६ मध्ये १५ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात पोलिसांनी जितेंद्र ऊर्फ बाबुलाल शिंदे (२५), संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीचंद भैलुमे या नराधमांना अटक केली. या तिन्ही आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव जिल्ह्यातील वकील संघटनेने घेतला होता. शेवटी संतोष भवाळच्या वतीने पुणे जिल्ह्यातील बाळासाहेब खोपडे यांनी वकीलपत्र स्वीकारले. तर नितीन भैलुमेच्या वतीने प्रकाश आहेर यांनी वकीलपत्र स्वीकारले. पण मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेच्यावतीने कोणीही वकीलपत्र स्वीकारले नव्हते. शेवटी न्यायालयाने या प्रकरणात योहान मोकासरे यांची नियुक्ती केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defence lawyer yohan makasare threatened over phone by unknown person case registered
First published on: 24-11-2017 at 13:35 IST