नांदेड जिल्ह्यामध्ये तीन हजार सोळा गणपती मंडळाची नोंद झाली करण्यात आली आहे. मात्र, येणाऱ्या गणपती विसर्जनाला मंडळांना बँड उपलब्ध होत नाहीयेत. त्यामुळे नांदेड शहरासह ग्रामीण भागातील मंडळांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत डीजे वाजवण्याची परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हेही वाचा- येत्या ५ दिवसांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
गणेश मंडळांची गणपती विसर्जनता डीजे वाजवण्याची मागणी
एकीकडे कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांनी सर्व मंडळांना शासनाच्या गाईडलाईननुसार डीजे वाजवण्याची परवानगी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील मंडळांना देखील डीजे वाजवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मंडळाच्या अध्यक्षांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात हे हिंदू राष्ट्र झाले असून हिंदू समाज बांधवांनी सगळे सण मोठ्या उत्साहात साजरे करावेत. मात्र, तसे काही होताना दिसत नाहीये. आम्हाला डीजे लावण्याची परवानगी नाकारण्यात आली. मग आम्ही आमचे सण पाकिस्तानात जाऊन साजरे करायचे का? असा सवाल मंडळाच्या अध्यक्षांनी केला आहे.