कोल्हापूर : येथील महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी असोसिएशनच्या वतीने कोल्हापूरचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना येथे बुधवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. नारळीकर यांचे स्मारक कोल्हापुरात साकारावे, अशी मागणी करण्यात आली.
महाद्वार रोडवरील नारळीकर भवन येथे जयंत नारळीकर यांचे निवासस्थान होते. याच जागी आज त्यांच्या प्रतिमेला भाजपचे सचिव अशोक देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. असोसिएशनचे अध्यक्ष श्याम जोशी यांनी महाद्वार रोडचे रहिवासी आमच्या शेजारी वास्तव्यास असणारे कोल्हापूरचे थोर शास्त्रज्ञ आणि त्यांच्याविषयी आठवणी सांगितल्या. त्यांचे स्मारक कोल्हापुरात व्हावे, अशी मागणी केली.
कार्याध्यक्ष भालचंद्र लाटकर, सचिव डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, उमेश लाटकर, मालोजी केरकर, हेमंत आराध्ये, शिवनाथ पावसकर, किरण धर्माधिकारी, अमित माने, केदार पारगावकर, अमित निगवेकर, व्यापारी, रहिवासी उपस्थित होते.