राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेल्या आरोपांसंदर्भात पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये न बोलावता त्यांच्या घरी जाऊन बीकेसी पोलीस तपास करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी सर्वच राजकीय नेतेमंडळींना कानपिचक्या दिल्या आहेत. पुण्यात आज अजित पवारांचे ३१ ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. सूस भागात एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर त्यांना प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीनं वागावं…

अजित पवारांनी कार्यक्रमानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सर्वच राजकीय पक्षांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला आहे. फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात भाजपा आंदोलन करणार असल्याबाबत विचारणा करताच अजित पवारांनी भूमिका मांडली आहे. “प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. नोटीश कशामुळे दिली? माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने वागावं. देशात, राज्यात आपल्याकडे अशी परिस्थिती कधीच नव्हती…नोटिसा देणं, वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं वगैरे. मी पंतप्रधानांसमोर देखील त्याबाबत वक्तव्य केलंय. प्रत्येकानं आपापलं काम करावं. जनतेनं ज्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm ajit pawar targets political leaders on devendra fadnavis inquiry notice pmw
First published on: 13-03-2022 at 08:48 IST