भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) चुकीचा उल्लेख झाल्यानं सगळीकडे चर्चा सुरू आहे. चुकीचा शब्द वापरला गेल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. याप्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाऐवजी चुकीचा शब्द वापरण्यात आला असल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. त्यावरून बरीच चर्चाही सुरू आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याची दखल घेत कारवाईचा इशारा दिला. मात्र, गृहमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवर आक्षेप नोंदवत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

आणखी वाचा- भाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; व्हायरल स्क्रीनशॉर्टमुळे खळबळ

“याच्यामागे कोण आहे, हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता,” असं सांगत निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते अनिल देशमुख?

“भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल असा अपमानास्पद उल्लेख पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपा आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल,” असं देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Derogatory reference on bjp official website about raksha khadse chandrakant patil anil deshmukh bmh
First published on: 28-01-2021 at 13:45 IST