नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारल्यावर हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर नारायण राणेंनी दिलं होतं. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली होती. मात्र कामामध्ये व्यग्र असल्याचे कारण सांगून राणे यांनी हजर राहिले नव्हते. हे प्रकरण दिवसेंदिवस तापत असून यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग पोलिसांना या प्रकरणावरून सुनावले आहे.

सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते! सीआरपीसी १६०ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलीस अधिकाऱ्यांवर आयपीसी १६६ अ अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी आहे, असं फडणवीसांनी ट्वीट करून म्हटलंय.

दरम्यान, “असे न केल्यास भाजपा CRPC 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल,” असंही फडणवीस म्हणाले आहेत.

अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेणाऱ्या नितेश राणेंना आणखी एक धक्का; जामीन मिळाला तरी…

नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धाव घेतली आहे. दरम्यान त्यांच्या अर्जावर बुधवारी दोन्ही वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला. याप्रकरणी गुरुवारी निकाल दिला जाईल असं न्यायालयाने सांगितलं होतं. यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की अटक होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.