सांगली : जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य स्थितीमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालेला असताना आरफळ सिंचन योजनेमधून पाण्याचे आवर्तन सुरू करण्याचे निर्देश जलसंपदा तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. खासदार संजयकाका पाटील यांनी आरफळ योजना तातडीने सुरू करावी यासाठी पाठपुरावा केला होता. आरफळ सिंचन योजनेचे आवर्तन त्वरित सुरू करावे आणि दुष्काळी स्थितीत शेतकर्‍यांना दिलासा मिळावा यासाठी खासदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी केली होती.

खा. पाटील यांनी सांगितले, पलूस व कडेगावसहीत तासगाव तालुक्याला आरफळ योजनेतून पाणी मिळावे याकरीता आरफळ सिंचन योजनेच्या टप्पा क्र.४ मधील तारळी लिंकचे अंतिम टप्प्यात आलेले काम लवकरात लवकर पूर्ण करुन जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणणेबाबतही मागणीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे केली आहे. हे कामही लवकरात लवकर पूर्ण करणेबाबत ग्वाही देण्यात आली.

हेही वाचा…सांगली : शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आटपाडीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, भाजप तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा प्रमूख प्रभाकर पाटील, अमोल काटकर, अंकुश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.