काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिवानी वडेट्टीवार स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलत आहेत. शिवानी वडेट्टीवर यात म्हणाल्या आहेत की, बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरले पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते. तसेच या विचारांमुळे महिलांना भीती वाटायची. या व्हिडीओमुळे राज्यतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळपासूनच अनेक नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

शिवानी वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता, फडणवीस यावर म्हणाले की, काही लोकांना इतिहास माहिती नाही आणि वर्तमानही माहिती नाही. हे लोक विचार न करता काहिही बोलतात. अशा लोकांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. कोणीही एखादा बुद्धीपूर्ण तर्क मांडला तर माझ्यासारख्या माणसाने त्यावर उत्तर द्यायला पाहिजे. जर बिना तर्काचं (तर्कहीन) किंवा बिना बुद्धीचं (निर्बुद्ध) बोललं जात असेल तर त्यावर आपण काय बोलणार.

हे ही वाचा >> भाजपाकडून तुम्हाला ऑफर आहे का? खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ” पंतप्रधान मोदींनी लोकसभेत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात वीर सावरकरांविषयीचे विचार आक्रमकपणे मांडले. आपल्या भाषणात वीर सावरकरांवर टीका करताना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधात वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून माझ्यासारख्या आणि येथे असलेल्या महिलांनी सुरक्षित कसे समजावे? दरम्यान, अशा माणसांची हे लोक (भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट) यात्रा काढत असल्याचा चिमटाही शिवानीने काढला आहे.