शाच्या राजकारणाप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणात देखील घराणेशाहीची चर्चा नेहमीच ऐकायला मिळत असते. अनेक नेतेमंडळी राजकीय पक्षांवर, त्यातल्या नेत्यांवर, त्यांच्या मुलांवर घराणेशाहीवरून टीका करत असता, तर दुसरीकडे यावरून सारवासारवीची भूमिका घेतली जात असल्याचं पाहायला मिळत असतं. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपल्या घरातून आपणच निवडणूक राजकारणात येणारी शेवटची व्यक्ती असू, असं म्हटलं आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृचा फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी बोलताना फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अमृता फडणवीसांना राजकारणात पडायचं नाही!

राजकारणात सक्रीय होण्याविषयी अमृता फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्याला सध्या तरी यात पडायचं नसल्याचं सांगितलं. “मला जेव्हा वाटतं, तेव्हा मी फ्रंटफूटला येते आणि खेळून मग जाऊन बसते. खरं तर मला राजकारणात यायची बिलकुल इच्छा नाही. समाजकारणात माझी कामं सुरळीतपणे मी करू शकते. जे मला महत्त्वाचे विषय वाटतात त्यात पुढे जाऊन कामं करते. त्याव्यतिरिक्त बँकिंग, माझं गाणं, माझं कुटुंब मला सांभाळता येतं. त्यामुळे त्यात मला सध्या पडायचं नाही”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

“…नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”, अमृता फडणवीसांचं ट्रोलर्सला प्रत्युत्तर; म्हणाल्या, “यांच्या ट्रोलिंगमुळे…!”

“माझी इच्छा नाही की कुटुंबातील कुणी राजकारणात यावं”

दरम्यान, त्यांच्या या उत्तरानंतर देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात स्पष्ट मत मांडलं. “निवडणूक राजकारणातला माझ्या घराण्यातला मी शेवटचा असेन. दुसरा कुणी नसेल. कारण मला वाटत नाही कुणी येईल आणि माझी इच्छाही नाही की कुणी यावं. कुणाला यायचं असेल तर मी नाही म्हणणार नाही. पण मला वाटत नाही की कुणी येईल”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी राजकारणाला पुरून उरेन, पण…”

“राजकारणाला पुरून उरण्याची क्षमता माझ्यात आहे. त्यामुळे मी त्याला घाबरत नाही. पण मला जे दिसतंय ते मी सांगतो. माझ्यानंतर माझ्या परिवारातलं कुणी राजकारणात येईल, असं मला दिसत नाही. माझे वडील राजकारणात होते, तेव्हा मी खूपच लहान होतो. मी कधीच हा विचार केला नव्हता की मी राजकारणात येईन. मला विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचं होतं. मला वकील बनायचं होतं. पण अंतिम वर्षाला असतानाच नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि सगळा मार्गच बदलला. माझी पत्नी, मुलीनं काय करावं याचं काही बंधन नाही. पण मला जे वास्तव दिसतंय, त्यावरून अजून कुणी राजकारणात येईल असं मला वाटत नाही”, असं फडणवीस म्हणाले.