उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचं कौतुक केलं आहे. धनंजय मुंडे नेहमी पोटतिडकीने बोलत असतात. बीडमधील जनतेवर प्रेम करण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.

“धनंजय मुंडे २०१२ पासून माझ्याबरोबर काम करत आहेत. धनंजय मुंडे यांच्या वाट्याला आयुष्यभर संघर्षच आला आहे. पण, संकटाला धनंजय मुंडे कधीही डगमगले नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत काम करून लोकांच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केलं. संघर्षातून वाट काढत धनंजय मुंडे यांनी नेतृत्व घडवलं आहे,”

हेही वाचा : “शरद पवार यांनी बीड जिल्ह्याला काय दिलं?” धनंजय मुंडे यांचा थेट हल्लाबोल

“२०१४ ते २०१९ विधानपरिषद विरोधी पक्षनेते म्हणून उत्कृष्ठ असं काम धनंजय मुंडे यांनी केलं. महाविकास आघाडीच्या काळात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करण्यात आलं होतं,” असं अजित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “हे जे उपरे नेते येतात, त्यांना सांगा…”, उद्धव ठाकरे यांची केसीआर यांच्यावर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही काम करणारी माणसं आहोत. कोणत्याही अधिकाऱ्याला विचारा आम्ही कारण नसताना त्रास देत नाही. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतो. चांगलं काम नाही केलं, तर त्याचा बंदोबस्तही करतो. शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत,” असं अजित पवारांनी म्हटलं.

“नवीन कार्यकर्ते तयार करायचे आहेत. तरुण नेतृत्व तयार करायचं आहे. आम्हालाही राजकारणात ३५ वर्षे झाली आहेत. प्रत्येकाचा काळ असतो,” असं अजित पवार म्हणाले.