महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी बारामतीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केक आणला, जो पवारसाहेबांनी भरवला याचा आपल्याला आनंद आहे असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय @PawarSpeaks साहेबांची भेट घेतली. @supriya_sule ताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला. @NCPspeaks हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा ‘आधारवड’ कायम कुटुंबासाठी भक्कम उभा असतो. धन्यवाद साहेब, ताई ! असाच आशीर्वाद राहू द्या pic.twitter.com/a6czzA9W8n
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 16, 2020
आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले धनंजय मुंडे?
करोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली. सुप्रिया सुळेताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला. राष्ट्रवादी हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा आधारवड कायम कुटुंबासाठी भक्कम उभा असतो. धन्यवाद साहेब, ताई असाच आशीर्वाद असूद्या