छत्रपती संभाजीनगरमध्ये आज (रविवार) महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’सभा पार पडत आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित आहेत. या सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि विधानसभा विरोधीपक्ष अजित पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी या सभेतून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला.

सरकारला चोर म्हटलं तर आपलं सदस्यत्व कधी जाईल, कुणाला सांगता येत नाही, अशी भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यावरून धनंजय मुंडे म्हणाले, “आता अशी परिस्थिती आहे की, सरकारच्या विरोधात कुणी काही बोललं तर पोलीस कधी घरात येतील? हे काही सांगता येत नाही. सरकारला जर चोर म्हटलं, तर कधी आपलं सदस्यत्व (आमदारकी, खासदारकी) जाईल, हे कुणालाही सांगता येत नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वानं वक्तव्य केलं कुठे, निकाल लागला कुठे, आणि सदस्यत्व रद्द कुठे झालं… आज या सरकारविरोधात जे कुणी बोलेल, त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय,” अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

PM Narendra Modi On Congress
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला; म्हणाले, “बारशाला गेला आणि बाराव्याला…”
Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…
sanjay shirsat big statement on congress
“काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपा अन् शिंदे गटाला छुपा पाठिंबा, लवकरच…”; संजय शिरसाट यांचं मोठं विधान

MVA Rally in Chhatrapati Sambhajinagar Live: “एवढा भला माणूस मी पाहिला नाही”, अशोक चव्हाण यांनी केलं उद्धव ठाकरेंचं कौतुक!

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आणीबाणीच्या काळातील राहत इंदोरींबरोबर घडलेला एक प्रसंगही सांगितला आहे. धनंजय मुंडे आपल्या भाषणात म्हणाले, “मी राहत इंदोरींची एक मुलाखत ऐकत होतो. त्यांनी आणीबाणीचा काळ सांगितला. राहत इंदोरी म्हणाले आणीबाणीच्या काळात मी सरकारला चोर म्हटलं होतं. तर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मला ठाण्यात बोलवू माझी चौकशी केली. तुम्ही सरकारला चोर कसं काय म्हणालात? असं विचारलं. तेव्हा राहत इंदोरी म्हणाले, मी भारत, पाकिस्तान, अमेरिका किंवा ब्रिटनच्या सरकारला चोर म्हटलं नाही. मी तर फक्त सरकार चोर आहे, असं म्हणालो. तेव्हा पोलीस म्हणाले, इंदोरी साहेब, तुम्ही आम्हाला मूर्ख समजत आहात का? आम्हाला माहीत नाही का, कोणती सरकार चोर आहे?”