शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या धनराज महाले यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला. घड्याळ सोडून त्यांनी आज पुन्हा एकदा शिवबंधन हाती बांधलं आहे. माजी आमदार धनराज महाले हे आता पुन्हा एकदा शिवसेनेत आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर धनराज महाले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. हाती भगवा झेंडा घेऊन आणि शिवबंधन बांधून धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. धनराज महाले हे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार होते. मात्र त्यांनी आज अखेर शिवबंधन हाती बांधलं आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीसाठी हा धक्काच म्हणता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनराज महाले हे मूळचे शिवसेनेचेच नेते आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने धनराज महाले यांना दिंडोरीतून तिकिट दिले. त्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्या निवडून आल्या. त्यांनी धनराज महाले यांना लोकसभा निवडणुकीत हरवलं. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनराज महाले यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला.

देशहिताच्या आड धर्म येऊ देऊ नका-उद्धव ठाकरे
देशहिताच्या आड धर्म येऊ देऊ नका असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एक देश, एक निशाण, एक विधान हे असलंच पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एक देश म्हटल्यावर एका देशात सगळे आले. भाषावर जी प्रांतरचना झाली आहे. त्यामुळे भाषेचं महत्त्व आहे. मात्र अनुच्छेद ३७० रद्द करणं हा निर्णय योग्यच आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanraj mahale joins shiv sena again scj
First published on: 16-08-2019 at 13:30 IST