scorecardresearch

“तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी मारहाण करायची”, बागेश्वर महाराजांचं वादग्रस्त विधान; देहू विश्वस्त म्हणाले…

वारकरी संप्रदाय हा सहिष्णू; बंबाजी, रामेश्वर भट्ट यांना माफ करणारा

Dhirendra krishna maharaj controversial comment on sant tukaram maharaj (1)
संत तुकाराम, धीरेंद्र कृष्ण महाराज (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तुकोबांना घास भरवल्याशिवाय जिजाबाई अन्न, पाणी घेत नव्हत्या. डोंगराच्या ठिकाणी नामस्मरणात असलेल्या तुकोबांना त्या भाकरी खाऊ घालून यायच्या. पतीव्रता त्यागाची भूमिका त्यांची होती. त्यामुळे त्यांच्यावर चुकीचे वक्तव्य करू नयेत. अगोदर सविस्तर माहिती घ्यावी मगच बोलावे. वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे. बंबाजी, रामेश्वर भट्ट यांना माफ करणारा आहे.

हेही वाचा >>> धीरेंद्र कृष्ण महाराजांचे संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान; म्हणाले “त्यांची पत्नी…”

बागेश्वर महाराज आम्ही तुम्हाला माफ करतो. क्षमा करणे हा वारकऱ्यांचा सर्वात मोठा गुण आहे. संतांवर चुकीचे वक्तव्ये करू नयेत. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना आवाहन करतो की यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. संतांवर कोणी काही बोलू नये म्हणून यावर कायदा बनवावा. जेणेकरून अशा गोष्टींना पायबंद बसेल. अशी प्रतिक्रिया देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 16:19 IST
ताज्या बातम्या