आतापर्यंत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगितलं जात असताना, आज काँग्रेसच्या एका नेत्यांने एक मोठं विधान केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात बेबनाव असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसच नेत्याच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. आता भाजपामध्येच अंतर्गत मतभेद आहेत की काय? असं बोललं जात आहे.

हेही वाचा – “हलवा आहे का? भ्रमिष्ट झाल्यासारखे …”; बाळा नांदगावकरांची कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंवर टीका!

‘राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांच्यात बेबनाव असल्याचे दिसून येते. सदर माहिती शेलार यांना त्यांच्याकडून प्राप्त होऊ शकते. राज्यात भाजपाची सत्ता आहे हे विसरले का? चुकीचे वर्तन झाले असल्यास पोलिसांवर कारवाई करणार की नाही याचे आधी उत्तर द्या.’ असं काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

हेही वाचा – Shraddha Murder Case : मग महाराष्ट्राचं तत्कालीन सरकार आणि पोलीस या सगळ्यावर थंड का? – आशिष शेलार

भाजपा नेते आशिष शेलार यांनी काल श्रद्धा वालकर खून प्रकरणावरून ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत ठाकरे सरकार व पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर टीका केली होती. तो व्हिडिओ आज सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटसोबत जोडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते आशिष शेलार? –

‘श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी लिहिलेल्या पत्रानुसार तिच्या जीवाला धोका असून तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. महाराष्ट्र पोलिसांनी या पत्राची दखल का घेतली नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? सरकारमध्ये बसलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थन होते म्हणून? की या सर्व प्रकारावर पांघरूण घालायचे होते? या सगळ्याची चौकशी होणे ही काळाची गरज आहे. तत्कालीन पोलीस आणि सरकारने कडक कारवाई केली असती तर श्रद्धा आज वाचली असती. माझी पोलिसांना विनंती आहे की, हे पत्र दाबण्यात आले का? याची चौकशी दडपण्यात आली का? आफताबवर कारवाई होऊ नये याबाबत कुणाचे दडपण होते का? या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे.’ असं शेलार यांनी ट्वाटद्वारे म्हटलं आहे.