अमरावती लोकसभा मतदारसंघावरून भाजपाच्या मित्रपक्षांमध्येच रस्सीखेच सुरू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या मतदारसंघावरून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोघांनीही अमरावती मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्यातील मतभेत उघड झाले आहेत. बच्चू कडू यांनी प्रहारकडे चांगला उमेदवार असल्याचं सांगत आमची तयारी सुरू आहे, असं सांगितलं. तसेच प्रहार राज्यात विधानसभेच्या १५ जागा लढवणार असल्याचंही जाहीर केलं. ते शनिवारी (२७ मे) अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, “अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी आमची पूर्ण तयारी झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकी मी स्वतः अपक्ष लढलो होतो. तेव्हा कोणताही राजकीय पक्षाचा पाठिंबा नव्हता. असं असताना केवळ पाच हजार मतांनी पडलो होतो. त्याअनुषंगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीती आता आमची तयारी झाली आहे.”

“अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे चांगला उमेदवार”

“अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे चांगला उमेदवार आहे. त्यामुळे जागेची मागणी करणं चुकीचं नाही. मागणी तर करायलाच पाहिजे. नंतर याला कसं सामोरं जायचं ते पाहू,” असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

रवी राणांच्या दाव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

दरआठवड्याला वक्तव्यं बदलतात, भाजपाच्या आशीर्वादाने बच्चू कडूच नवनीत राणांच्या प्रचाराला येतील, असं वक्तव्य रवी राणांनी केलं. याला उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, “रवी राणांचा आशावाद चांगला आहे. मात्र, समोरची लढाई कशी लढायची हे आम्ही पाहू.”

हेही वाचा : “युतीत जागा मिळाली तर ठिक, नाहीतर…”, अमरावती लोकसभेसाठी बच्चू कडू आक्रमक, रवी राणांच्या वक्तव्यावर म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही १५ विधानसभा जागांची तयारी करतो आहे”

“आम्ही १५ विधानसभा जागांची तयारी करतो आहे. भुसावळ, जळगावमध्ये दोन जागा, नंदुरबार, सोलापूर, अमरावतीत तीन जागा, नागपूर एक जागा, अकोल्यात दोन जागा आणि वाशिक अशा एकूण १५ जागांची तयारी करतो आहे,” असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.