रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात वानर व माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबरोबर जिल्ह्याच्या वन वनक्षेत्रात ४ नर जातीचे वाघ तसेच ६ ब्लॅक पँथर असल्याची माहिती विभागीय वनधिकारी गिरीजा देसाई यांनी दिली आहे. हे सर्व जंगली प्राणी वन विभागाच्या सीसीटीव्ही ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चिपळूण येथे नुकत्याच झालेल्या चिपळूण आणि रत्नागिरी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि ग्लोबल चिपळूण टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने वन वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यशाळेच्या वेळी त्यांनी ही माहिती प्रास्ताविक करताना दिली. त्या म्हणाल्या, रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण वन क्षेत्रापैकी ९९ टक्के क्षेत्र खासगी मालकीचे आहे. त्यात फक्त १ टक्का वनक्षेत्र वन विभागाकडे आहे. मात्र असे असले तरी सर्वच वनक्षेत्रात विविध प्राण्यांचे वास्तव्य आहे. जिल्ह्यातील या खासगी वन क्षेत्रात ६ ब्लॅक पँथर यांच्यासह वानर व माकडांची मोठी संख्या असल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्र भागात वन विभागाकडून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चार वाघांचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला लागलेल्या वनक्षेत्रात असलेल्या या प्राण्यांची संख्या बघता पर्यावरणाच्या दृष्टीने सुखद आहे. आतापर्यंत जिल्ह्याच्या काही भागात कुठे ना कुठे वाघ दिसल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र त्यावर वन विभागाला स्पष्टता मिळत नव्हती. मात्र आता हे प्राणी सिसिटीव्ही मध्ये दिसून आल्याने आता वन खात्याने यावर शिक्कामोर्तब केले असल्याचे वनअधिकारी देसाई यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरी जिल्ह्यातील वन क्षेत्रात वानर व माकडांची मोठी संख्या आहे. याबरोबर ४ नर जातीचे वाघ व ६ ब्लॅक पँथर आहेत. वन विभागाने जंगलात लावलेल्या कॅमे-यांमुळे हे वन प्राणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. वनधिकारी गिरीजा देसाई