डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला असून पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत २८ आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला . आरोपींमधील २८ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केलं जात होतं. यानंतर मुलीला फार्म हाऊसवर नेऊन आरोपींकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना दिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या प्रकरणाचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. डोंबिवली सामूहिक बलात्कारातील आरोपींना आमच्या ताब्यात द्या,आम्ही त्यांची धिंड काढू, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी काल दिली. चव्हाण यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात काल भेट दिल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. यावेळी चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात आरोपी आमच्या ताब्यात द्या आशा घोषणा दिल्या होत्या.