पुणे पोर्श प्रकरणानंतर सोशल मीडियावर रॅप साँग शेअर करणाऱ्या एका कंटेट क्रिएटरविरोधात गुन्हादाखल कऱण्यात आला आहे. आर्यन देव नीखरा असं त्याचं नाव असून त्याला २७ मे रोजी पुण्यात म्हणजे आजच पुणे पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. परंतु, त्याने त्याच्याविरोधातील खटला मागे घेण्याची विनंती केली आहे, कारण त्याच्याकडे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचायला पुरेसे पैसेच नाहीयत. यासंदर्भातील त्याने व्हिडिओ त्याने त्याच्या इन्स्टा खात्यावरून पोस्ट केला आहे.

मी एक मध्यमवर्गीय व्यक्ती आहे, माझ्या जीवनाची किंमत काय आहे, त्याऐवजी मला मारा”, असे त्याने म्हटलं. “त्यांनी माझ्यावर इंटरनेटवर गैरवर्तन केल्याबद्दल आरोप लावले आहेत. प्रत्येकजण ते करतो; या घटनेत एक वॉर्निंग पुरेशी होती. मी पुणे सायबर सेलला गुन्हा मागे घेण्याची विनंती करतो. मला आणि माझ्या कुटुंबाला जगू द्या; मी फक्त एक कंटेट क्रिएटर आहे, पण येथे अनेक राक्षस आहेत”, असं त्यानेत्याच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले.

Two Ramnagar police officers received show cause notice for negligence in womans
हिट अँड रन प्रकरणाच्या तपासात दिरंगाई, दोन पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
chaos police station pune, police station pune,
पुणे : पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्याची हिंमत येते कोठून?
venugopal dhoot news in marathi
वेणुगोपाल धूत , इतरांना एक कोटी भरण्याची ‘सेबी’ची नोटीस
Delivery boy killed
दीड लाखांचा iPhone ऑनलाईन मागवला, डिलिव्हरी मॅन येताच पैसे देण्याऐवजी त्याचाच जीव घेतला
railway employees
Railway Employees Arrested : धक्कादायक! वरिष्ठांकडून स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून ट्रॅक फेल करण्याचा प्रयत्न; तिघांना अटक
Munawar Faruqui Death Threat
Munawar Faruqui : बिग बॉस विजेत्या मुनव्वर फारुकीला ठार मारण्याची धमकी, तडकाफडकी ‘या’ ठिकाणी रवाना
Ragpicker injured
Ragpicker Injured in Blast : ढिगाऱ्यातून कचरा वेचताना अचानक झाला स्फोट, वेचकाची बोटे तुटली; कोलकात्यात नेमकं काय घडलं?

व्हिडीओमध्ये तो म्हणोय की, “मी व्हिडिओ पोस्ट केला आणि मीडियाने ते व्हायरल केले. हा अपघात ज्याच्यामुळे झाला त्यानेच हे रॅप साँग केल्याचं मीडियाने दाखवलं. बदनामी झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला. प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी हे केले गेले. मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे, त्याऐवजी माझ्या जीवाची काय किंमत आहे?

त्याने असेही म्हटले आहे की, मी गाण्यात कोणाचाही गैरवापर केलेला नाही. कारण ते एक विडंबन होतं. २७ मे रोजी तेथे पोहोचायचे आहे आणि वेळेवर पोहोचण्यासाठी त्याच्याकडे गाडी किंवा पैसे नाहीत. कारण त्याला २५ मे रोजीच नोटीस बजावण्यात आली होती. त्याला तुरुंगात टाकले जाईल आणि गुन्हेगार म्हणून टॅग केले जाईल आणि हाय-प्रोफाइल प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून प्रक्षेपित केले जाईल अशी भीतीही त्याने व्यक्त केली.

दोघांची हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाची जामिनावर सुटका करण्यात आली आहे, ड्रायव्हरला ब्लॅकमेल करण्यात आले आहे, लॅबच्या अहवालात फेरफार करण्यात आली आहे आणि त्यांना तो तुरुंगात हवा आहे असे सांगून नीखराने व्हिडिओ संपवला.

१९ मे रोजी मध्यरात्री भरधाव पोर्श कारने एका दुचाकीला उडवलं. या दुचाकीवर असणारं जोडपं या अपघातामुळे जागीच मृत पावलं. एवढंच नव्हे तर दोघांच्या हत्येप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर संबंधित अल्पवयीन आरोपीला १५ तासांत जामीन मिळाला. हे वृत्त प्रसिद्ध होताच सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे हे प्रकरण आता हाय वोल्टेज ठरत आहे.