राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज साताऱ्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली दोघांमध्ये काही वेळ चर्चाही झाली त्याचा तपशील संपवू शकला नाही. या वेळी त्यांनी कराड येथे उद्यापासून होणाऱ्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रयोगाचे निमंत्रण दिले.

राष्ट्रवादीचा खासदार जर भाजपच्या खासदाराला भेटला असेल, तर नक्कीच राजकारण आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारा एक कलावंत जर महाराजांना भेटला, तर यामध्ये राजकारण होणार नाही, असे स्पष्ट मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. सध्याचे सरकार कधी पडेल यावर मी ज्योतिषी नाही, याविषयी माझा अभ्यास नाही, असे त्यांनी नमूद केले.पण सगळ्याच गोष्टीत राजकारण आणले, तर आयुष्याची मजाच संपून जाईलअसे ते म्हणाले.खासदार डॉ. कोल्हे यांनी आज खासदार उदयनराजे यांची साताऱ्यात त्यांच्या जलमंदिर या निवासस्थानी भेट घेतली. कराड येथील कार्यक्रमासाठी खासदार उदयनराजे यांनी आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती केली.

डॉ. कोल्हे म्हणाले, माझ्या जगदंब क्रिएशनला उदयनराजे भोसले यांचा कायमच पाठिंबा राहिला आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे कराड येथे पश्‍चिम महाराष्ट्रात होणारे हे शेवटचे प्रयोग आहेत. त्यानंतर आम्ही विदर्भ, मराठवाड्यात प्रयोग घेणार आहोत. त्यामुळे मी उदयनराजेंना खास निमंत्रण द्यायला आलो होतो.

उदयनराजे आणि माझे चांगले ऋणानुबंध आहेत. त्यांचा नेहमीच आम्हाला पाठिंबा राहिला आहे. सगळ्याचा गोष्टीत राजकारण आणले तर आयुष्याची मजा संपून जाईल.’अलीकडे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना तुमची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे, यावर ते म्हणाले, माझ्या नाटकाचे जर प्रयोग असतील आणि माझ्या पक्षाचा एखादा कार्यक्रम असेल तर मला उपस्थित राहता येत नाही.याची सर्व कल्पना मी माझ्या वरिष्ठांना देऊनच हे कार्यक्रम करत असतो. यामध्ये कोणताही गैरसमज करण्याची गरज नाही. सध्याचे सरकार कधी कोसळेल, या विषयावर बोलायला मी ज्योतिष नाही, तसेच याविषयी माझा अभ्यासही नाही.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये कोणतीही तुलना करण्याची गरज नाही. दोघेही आमच्यासाठी आदरणीय आहेत. पक्षात आमचे नेते शरद पवार सर्व निर्णय घेत असतात. त्यामुळे दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री झाला, तरी आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी (दि. २४) सातारा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली होती.या वेळी आमदार अनिल बाबर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते. या नेत्यांत विविध विषयावर दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी आमदार कोल्हे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यात कोपरखळ्या अन् हास्यविनोद रंगले होते.