येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालचे प्रभारी अधिष्ठाता तसेच पल्मोनरी मेडिसिन विभागाचे विभाग प्रमुख डॉ दिलीप गोविंदराव म्हैसेकर यांची नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आज नियुक्ती करण्यात आली.
राज्यपाल तथा कुलपती चे विद्यासागर राव यांनी रविवारी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर डॉ दिलीप म्हैसेकर यांच्या नावाची घोषणा केली. डॉ म्हैसेकर यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. डॉ अरुण जामकर यांचा कार्यकाळ २० डिसेंबर रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. एकनाथ डवळे प्रभारी कुलगुरू म्हणून या पदाचा कार्यभार सांभाळीत होते.
डॉ दिलीप म्हैसेकर (जन्म १२ जुलै १९६०) यांनी १९८४ साली औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली. तर १९८९ साली मुंबईच्या जी एस वैद्यकीय महाविद्यालयातून (क्षयरोग व छातीचे विकार) या विषयात एमडी केले. डॉ म्हैसेकर यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव असून त्यांचे संशोधन निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनात प्रसिद्ध झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr dilip mhaisekar selected vice chancellor of health science university
First published on: 07-02-2016 at 16:40 IST