नगर : दारूच्या नशेत स्वत:च्या एक वर्ष वयाच्या चिमुरडय़ाला जमिनीवर आपटून त्याचा नराधम बापाने खून केल्याची घटना शहरातील तपोवन रस्ता भागात घडली. या संदर्भात तोफखाना पोलिसांकडे बाळाच्या आईने तक्रार दिली आहे. पोलिसांनी सोहम कुशाराम कुमावत (२१, मूळ रा. राजस्थान, सध्या तपोवन रस्ता, संस्कृती इमारतीशेजारी, नगर) याला सायंकाळी अटक केली आहे. त्याला उद्या, शनिवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळचे राजस्थानमधील असलेले सोहम व अर्चना कुमावत हे दाम्पत्य रोजगारासाठी नगरमध्ये आले. सोहम हा फरशी बसवण्याचे काम करतो. दोघांचा आंतरजातीय विवाह झाल्याने सोहम याचे आईवडील त्याला घरी येऊ देत नाहीत. त्यामुळे तो नगरमध्ये स्थलांतरित झाला.

जखमी चिरागला आई अर्चना हिने जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचे निधन झाल्याचे सांगितले. त्यामुळे अर्चना हिने रुग्णालयातच हंबरडा फोडला. नंतर सकाळी अर्चना हिने दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सोहम याला अटक केली. तपास पोलिस उपनिरीक्षक धायबर व हवालदार सुद्रीक करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* सोहमला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यावरून पती-पत्नीत भांडणे होत, सोहम हा अर्चनाला मारहाण करत असे. काल रात्री असाच सोहम दारू पिऊन आला व त्याने अर्चनाला मारहाण करण्यास सुरुवात केली. नशेतच त्याने एक वर्षांचा मुलगा चिराग याला उचलून जमिनीवर आपटले, त्याचा गळाही दाबला.