सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस भवनात क्षुल्लक कारणावरून दोघा तरूण कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्यानंतर दुस-याच दिवशी, सोमवारी एका सार्वजनिक उत्सवाप्रसंगी भाजपच्या दोघा माजी नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी होऊन परस्परांवर धावून जाण्याचा प्रकार घडला. पक्षाचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींसह काँग्रेव व शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिका-यांसमोर हा प्रकार घडला.

काल काँग्रेस भवनात दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत अभिवादनासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे काँग्रेस भवनातून बाहेर पडल्या. तेव्हा कार्यक्रमात छायाचित्र काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन कार्यकर्ते एकमेकांस भिडले. एकमेकांच्या आंगावर धावून जात धक्काबुक्की झाली. हा प्रकार पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, आंबादास करगुळे, विनोद भोसले आदींनी हस्तक्षेप करून मिटविला.

bjp attacks congress over sam pitroda wealth distribution remark
भाजपच्या हाती पित्रोदांच्या‘वारसा करा’चे कोलीत; भाजपचा हल्लाबोल, काँग्रेसची अडचण
What Amit Shah Said About Uddhav Thackeray And Sharad Pawar?
अमित शाह यांचा प्रहार! “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस असे अर्धवट..”
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
Shiv Sena shinde group leaders Upset Over Archana Patil s Nomination in Dharashiv Lok Sabha Constituency
अर्चना पाटील यांच्या उमेदवारीनंतर शिंदे सेनेमध्ये रोष, आरोग्यमंत्री सावंत यांचे समर्थक विरोधात

त्यानंतर सोमवारी, दुस-या दिवशी नाग पंचमीला तुळजापूर वेशीतील बलिदान चौकात एका संत महात्म्याच्या जयंती उत्सवाच्या मिरवणुकीचा शुभारंभ करण्यासाठी एकत्र आलेल्या भाजपच्या दोघा माजी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी होऊन त्याचे पर्यवसान गुद्दागुद्दीत झाले. भाजपचे माजी महापालिका सभागृहनेते सुरेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना शिंदे गाटाचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे व इतर प्रमुख नेते खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींची वाट पाहात ताटकळत थांबले होते. तेव्हा उशीर होऊ लागल्यामुळे सुरेश पाटील यांनी दोनवेळा खासदार डॉ. जयसिध्देश्वरांशी थेट संपर्क केला. तरीही ते उशिरा आले. येताना त्यांनी सुरेश पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक राजकुमार पाटील यांना सोबत आणले होते. यातच सुरेश पाटील यांच्या रागाचा पारा वाढला. तेव्हा राजकुमार पाटील हे त्यांच्याशी भिडले. खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि अन्य पक्षांच्या पदाधिका-यांच्या समोर दोघांनी पाटीलकी दाखवत गुद्दागुद्दी सुरू केली. तेव्हा गोंधळ उडाला. शेवटी शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिका-यांनी ही गुद्दागुद्दी थांबविली.

सुरेश पाटील हे भाजपमध्ये असंतुष्ट गटाचे नेते म्हणून गणले जातात. आमदार विजय देशमुख यांच्याबरोबर त्यांचा संघर्ष आहे. त्यांनी गेल्या महिन्यात पक्षाचा राजीनामाही दिला होता. परंतु प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्तक्षेपाननंतर त्यांनी राजीनामा परत घेतला होता. त्यांची ज्यांच्याशी थेट गुद्दागुद्दी झाली, ते राजकुमार पाटील हे आमदार विजय देशमुख यांचे कट्टर समर्थक समजले जातात.