भंडारा गोंदिया आणि पालघर या दोन लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. या दोन्ही मतदारसंघात २८ मे रोजी मतदान होणार आहे. तर या मतदानाचा निकाल ३१ मे रोजी जाहीर होईल. तसेत पलूस विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकही २८ मे रोजीच होणार आहे. पालघरमधील भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे तेथील जागा रिक्त झाली होती. तर भंडारा गोंदिया मतदारसंघात भाजपाचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. ज्यानंतर इथली जागाही रिकामी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे निधन झाल्याने पलूस कडेगाव मतदारसंघाचीही जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे सांगलीतही पोटनिवडणूक होणार आहे.

गोंदिया भंडारा मतदार संघात नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात शड्डू ठोकत भाजपाकडून लढवलेली खासदारकी सोडली. जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्याच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २८ मे रोजी मतदान होणार आहे. देशपातळीवर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला बहुतांशवेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता या निवडणुकांच्या वेळी काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eci announces lok sabha by election for palghar and bhandara gondiya constituencies
First published on: 26-04-2018 at 18:21 IST