Ed raids Shivsena Leader Sanjay Raut’s Residence : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. गेल्या नऊ तासांपासून संजय राऊत यांची चौकशी सुरू होती. अखेर आता ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. संजय राऊत हे तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर शिवेसेनेच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. तसेच संजय राऊत यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले आहेत. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Udayanraje Bhosale
उदयनराजे यांच्या संपत्तीत चक्क २१ कोटी रुपयांची घट
wardha lok sabha constituency, Amar Kale, sharad pawar ncp, amra kale campaign, Faces Setback , Complaints of Financial Mismanagement, amar kale not spending money, finance in campaign,
वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
Live Updates

Sanjay Raut Latest Marathi News: संजय राऊतांच्या घरावर ईडीचा छापा; अटकेची टांगती तलवार

21:53 (IST) 31 Jul 2022
ईडी कार्यालयासमोर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले

संजय राऊतांच्या अटकेनंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने ईडी कार्यालयाबाहेर जमा झाले आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीदेखील ईडी कार्यालयात जाऊन संजय राऊतांची भेट घेतली आहे.

19:35 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांच्या आईंचे अश्रू अनावर

संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतल्यावर संजय राऊत यांच्या आईचे अश्रू अनावर झाले होते.

19:21 (IST) 31 Jul 2022
ईडी कार्यालयात जाताना संजय राऊत अचानक मागे आले आणि म्हणाले, “पेढे वाटा…”

शिवसेना खासदार संजय राऊत यांची रविवारी (३१ जुलै) सकाळी सात वाजल्यापासून चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने सायंकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान त्यांना ताब्यात घेतलं. तसेच त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं. ईडी कार्यालयात जात असताना संजय राऊतांनी अचानक माध्यमांशी संवाद साधला. तसेच ईडीच्या कार्यालयावर प्रतिक्रिया व्यक्त केली. "लोकांना मारहाण करून खोटे पुरावे तयार केले जात आहेत. हे सर्व प्रयत्न महाराष्ट्राला, शिवसेनेला कमकुवत करण्यासाठी केले जात आहे," अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

सविस्तर बातमी...

18:41 (IST) 31 Jul 2022
संजय राऊत यांना ईडीने घेतलं ताब्यात ही महाभयंकर आणीबाणी - चंद्रकांत खैरे

संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांना ताब्यात घेणे ही आणीबाणी असून इंदिरा गांधी यांनी एकवेळ आणीबाणी लावली होती. त्याहीपेक्षा हे भयंकर आहे, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली आहे. भाजपकडून शिवसेनेला संपवून टाकण्याचे प्रयत्न सुरु असून शिवसेना संपणार नाही. भाजपचे नेतेच या कारवाईच्या विरोधात असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे.

18:02 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र ईडीच्या या कारवाईचे समर्थन केले असून राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊतांना आता कोणताही पक्ष घेणार नाही. त्यांनी आता भिंतीकडे तोंड करून बोलण्याची सवय करून घ्यावी, असा टोला देशापांडे यांनी लागवला आहे. वाचा सविस्तर

18:01 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांवरील कारवाईनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानावर आज (३१ जुलै) रोजी छापा टाकला. ईडीच्या या कारवाईनंतर आज सकाळपासून संजय राऊतांची चौकशी केली जात आहे. राऊतांवरील या कारवाईनंतर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राऊतांवरील कारवाईवर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे कारस्थान लज्जा आणि शरम सोडून सुरु आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करत होते. वाचा सविस्तर

18:00 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांपुढे आता कोणते पर्याय?

तब्बल ९ तासांची छापेमारी आणि चौकशीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी इडीने ताब्यात घेतले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राऊतांवर कोणती कारवाई केली जाणार याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांन सविस्तर माहिती दिली आहे. संजय राऊतांना आात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर राऊत दाद मागू शकतात. तसेच राऊतांना ईडी कोठडी सुनावली जाऊ शकते, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले आहे. वाचा सविस्तर

17:27 (IST) 31 Jul 2022
''झुकेंगे नही!''; ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं पहिलं ट्वीट

आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते, जो कभी हार नहीं मानता! झुकेंगे नही! जय महाराष्ट्र'', असे ट्वीट संजय राऊत यांन केले आहे. ईडीने ताब्यात घेतल्यानंतरचं संजय राऊतांचं पहिलं ट्वीट आहे.

17:18 (IST) 31 Jul 2022
कोणतीही नोटीस न देता ईडीचे अधिकारी माझ्या घरात घुसले - संजय राऊत

''या कारवाईल मी घाबरत नाही. अश्या प्रकरणानंतर अनेक जण पक्ष सोडून जातात. मात्र, संजय राऊत शिवसेना सोडून जाणार नाही. शिवसेना कमजोर करण्याचा प्रयत्न आहे. मी अधिकाऱ्यांना सहकार्य करतो आहे. माझ्यावर सुडाने कारवाई सुरू आहे. उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी माझ्यावर कारवाई सुरू आहे. कोणतीही नोटीस न देता ईडीचे अधिकारी माझ्या घरात घुसले'', अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1553716624170971137?s=20&t=zHBmppfAcNEcALjQNOZ0CA

संजय राऊत म्हणाले, "जी कारवाई व्हायची ती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिक यांचं माझ्यामागे बळ आहे. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरं जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल."

17:03 (IST) 31 Jul 2022
स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले - सुनील राऊत

ईडीसाठी पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आता समन्स दिले आहे. त्यासंदर्भात स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिय संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी दिली आहे.

16:53 (IST) 31 Jul 2022
पोलिसांकडून शिवसैनिकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न

नऊ तासानंतर चौकशी नंतर अखेर ईडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी बाहेर येऊन कार्यकर्यांना अभिवादन केले. यावेळी शिवसैनिकांनी ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोणत्याही परिस्थिती संजय राऊत यांना येथून जाऊ देणार नाही, असा पावित्रा घेल्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

16:27 (IST) 31 Jul 2022
संजय राऊत ईडीच्या ताब्यात; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

https://twitter.com/ANI/status/1553693665926660096?s=20&t=zHBmppfAcNEcALjQNOZ0CA

16:20 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा; पोलिसांचाही कडक बंदोबस्त

संजय राऊत यांना पुढील चौकशीसाठी ईडी कार्यालयात घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

16:17 (IST) 31 Jul 2022
भाजपाकडून इंग्रजांच्या धोरणाची अमंलबजावणी, विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई; नाना पटोलेंचे टीकास्त्र

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेली ही कारवाई काही नवीन नाही. त्यांच्यावर दबाब टाकण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करण्याचे इंग्रजांचे धोरण भाजपा राबवत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

16:07 (IST) 31 Jul 2022
राज्यपालांविरोधात महाराष्ट्रात रोष; त्यामुळेच ईडीची कारवाई - अरविंद सावंत

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात रोष निर्माण झाला होता. या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली जात असल्याची प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

16:00 (IST) 31 Jul 2022
पुढील तपासासाठी संजय राऊतांना ईडी कार्यालयात नेणार - सुत्र

संजय राऊत यांना पुढील चौकशीसाठी ईडी कार्यालयात घेऊन जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सकाळी ७ वाजता राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली होती. गेल्या ८ तासांहून अधिक काळ ईडीकडून चौकशी सुरू होती. दरम्यान, आता संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

15:54 (IST) 31 Jul 2022
जर तुम्ही शुद्ध आहात, तर शपथ घ्यायची गरज नाही - गिरीश महाजन

गेल्या बऱ्याच दिवसांपासून संजय राऊत यांना ईडीच्या नोटीस येत होत्या. त्यांच्यावर कारवाई सुरू होती. परंतु वारंवार सूचना देऊन सुद्धा संजय राऊत टाळाटाळ करत होते. त्यामुळे आज ईडीने त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. ऑफिसमध्ये जायला त्रास होत होता म्हणून ईडी त्यांच्या घरी गेली, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. तसेच जर तुम्ही शुद्ध आहात तर शपथ घ्यायची गरज नाही आणि तुम्हाला कोणी काही करू शकत नाही. तुमच्याकडे काही कागदोपत्री व्यवहार झाले नसतील तर त्यांना ईडीला घाबरण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.

15:40 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांवरील कारवाईशी भाजपाचा संबंध नाही - धर्मपाल मेश्राम

संजय राऊतांविरोधातील कारवाईचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ईडी सारखी संस्था संवैधानिक व्यवस्थेतून निर्माण झालेली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचा संबंध नाही. राज्यातील सरकार गेल्यापासून विरोधकांना काही काम उरले नाहीत, त्यामुळे ते भाजपावर सातत्याने टीका करतात, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.

15:35 (IST) 31 Jul 2022
केंद्र सरकार विरोधात जो बोलेल त्यांच्यावर कारवाई होते - नाना पटोले

केंद्र सरकारच्या देश विकणाऱ्या धोरणावर जो बोलेल त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्राच्यामाध्यमातून कारवाई सुरू आहे. संजय राऊतांवरील कारवाई ही दबावामुळे झाली आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळ आणखी किती लोकांवर कारवाई करावी, ते सरकारने ठरवावं, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

15:26 (IST) 31 Jul 2022
"ईडीच्या कारवाईला घाबरून कुणी आमच्याकडे येत असेल तर...", राऊत-खोतकरांचं नाव घेत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

ईडीने शिवसेना रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता खासदार संजय राऊत यांच्या घरी जाऊन चौकशी केल्यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत. स्वतः राऊतांनी ट्वीट करत ईडी कारवाई झाली तरीही शिवसेना सोडणार नाही, असं सूचक वक्तव्य केलं. यानंतर भाजपासह बंडखोर शिंदे गटावर ईडीचा दबाव दाखवून राजकीय नेत्यांना आपल्या पक्षात घेतल्याचा आरोप झाला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर दिलंय. तसेच ईडीच्या कारवाईला घाबरून कुणी आमच्याकडे येत असेल तर येऊ नका, असं जाहीर आवाहन केलं. ते रविवारी (३१ जुलै) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमी...

15:25 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांवरील ईडी कारवाईवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “त्यांना अटक होतेय की…”

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. भाजपासह शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाकडून या कारवाईचं समर्थन केलं जातं आहे, तर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून ही सुडाची कारवाई असल्याचा आरोप करत टीका होत आहे. आता राऊतांवरील कारवाईवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "राऊतांना अटक होतेय की नाही हे मला माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही," असं मत शिंदेंनी व्यक्त केलं. ते रविवारी (३१ जुलै) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमी...

15:13 (IST) 31 Jul 2022
ईडीची कारवाई विरोधकांवरच का? - रुपाली चाकणकर

ईडीची कारवाई विरोधकांवरच का? असा प्रश्न राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विचारला आहे. ईडीची कारवाई कोणावर होते आणि कोणावर होत नाही, हे संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे. ईडीची कारवाई नवाब मलिक आणि अनिल देशमुख्य यांच्यावरही झाली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही, असेही त्या म्हणाला.

14:55 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांवरील छाप्यामागचा सुत्रधार कोण? हे तपासलं पाहिजे - खासदार अरविंद सावंत

गुजराती आणि राजस्थानींनी महाराष्ट्र सोडल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे राज्यपाल स्वत: सांगतात. तसं पाहिलं तर श्रीमंत कोण आहे आणि कोणाच्या घरावर छापा पडतो आहे? असा प्रतिक्रिया शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणाचा सुत्रधार कोण आहे? हेही बघितलं पाहिजे, असेही ते म्हणाले.

14:34 (IST) 31 Jul 2022
राऊतांना अटक होतेय की नाही हे मला माहिती नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. भाजपासह शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाकडून या कारवाईचं समर्थन केलं जातं आहे, तर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून ही सुडाची कारवाई असल्याचा आरोप करत टीका होत आहे. आता राऊतांवरील कारवाईवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “राऊतांना अटक होतेय की नाही हे मला माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही,” असं मत शिंदेंनी व्यक्त केलं.

सविस्तर वाचा

14:26 (IST) 31 Jul 2022
काही गोष्टी उघडकीस आल्या असतील म्हणून ईडीची कारवाई- रावसाहेब दानवे

अर्जुन खोतकर यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांनी का शिवसेनेची साथ सोडली, ते शिंदे गटात का गेले, याचे उत्तर खोतकर देऊ शकतात. आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. ईडीने आमच्यामुळे नाही तर कदाचित त्यांच्या काही गोष्टी उघडकीस आल्या असतील म्हणून कारवाई केली आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

14:14 (IST) 31 Jul 2022
तपासयंत्रणांचा उपयोग राजकारणासाठी केला जातोय- बाळासाहेब थोरात

तपासयंत्रणांचा उपयोग राजकारणासाठी केला जातोय, हे लपून राहत नाही. राज्यपालांनी जे व्यक्तव्य केले आहे ते निषेधार्ह आहे. मराठी माणसाला कमी लेखणारे आहे. असे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

13:42 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांवरील ईडीची कारवाई म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - यशोमती ठाकूर

देशात दडपशाही सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर दबाब आणण्याच काम केलं जातं आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. जे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, त्यांच्यावर भ्रष्टाचार होते. मग आता ते वाशींग पावडरमध्ये स्वच्छ केले का? अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

13:37 (IST) 31 Jul 2022
संजय राऊत दोषी नसतील तर त्यांना घाबरण्याची आवश्यता नाही - आमदार संजय गायकवाड

गेल्या १५ दिवसांपासून त्यांना ईडी ऑफिसमध्ये चौकशी करता बोलावले जात आहे. पण ते टाळाटाळ करत आहे. त्यामुळे ही कारवाई झाली असावी. मात्र, संजय राऊत हे दोषी नसतील तर त्यांना घाबरण्याची आवश्यता नाही. अशी प्रतिक्रिया बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी

13:24 (IST) 31 Jul 2022
“यापूर्वीच त्यांना अटक व्हायला हवी होती”; ईडी कारवाईनंतर नवनीत राणांची राऊतांवर टीका

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. या अगोदरही राऊतांना याच घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलवण्यात आले होते. या कारवाईमुळे राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. या कारवाईनंतर खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. "ही कारवाई अगोदरच व्हायला हवी होती", असे म्हणत राणा यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे.

सविस्तर वाचा

13:19 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांवरील ईडी कारवाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, "देशातील कोणत्याही व्यक्तीची चौकशी..."

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने कारवाई केली. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राऊतांच्या मैत्री बंगल्याबाहेरच ईडीविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. दुसरीकडे राज्यात राजकीय नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील बीड दौऱ्यावर असताना ईडीच्या राऊतांवरील कारवाईवर भाष्य केलं. "या यंत्रणांना देशातील कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे," असं मत पवारांनी व्यक्त केलं.

सविस्तर बातमी...

13:18 (IST) 31 Jul 2022
"मी शिवसेना सोडणार नाही आणि...", ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं. दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होईल. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. याशिवाय घराची झडतीही घेतली जाण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी मी शिवसेना सोडणार नाही, असं वक्तव्य केलंय. त्यांचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आहे.

सविस्तर बातमी...

12:52 (IST) 31 Jul 2022
भाजपा नेते अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

संजय राऊतांना अटक झाली, तर मुलाखत कोणाला देणार? अशी काळीज सद्या उद्धव ठाकरेंना असल्याचा खोचक टोला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

https://twitter.com/BhatkhalkarA/status/1553639858039554051?s=20&t=GjR0Dy_46tG417SYcmRmlg

12:39 (IST) 31 Jul 2022
ईडीच्या कारवाईचा राजकारणाशी काहीही संबंध नाही - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

सीबीआय आणि ईडी स्वतंत्रपणे काम करतात. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

12:37 (IST) 31 Jul 2022
संजय राऊत व उद्धव ठाकरे यांनी पदाचा दुरूपयोग केला - नवनीत राणा

संजय राऊत यांना अटक होणार आहे. ही कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे होती. उशिरा कारवाई झाली. एका साध्या पत्रकाराकडे एवढे पैसे कुठून आले? अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. संजय राऊत व उद्धव ठाकरे यांनी पदाचा दुरूपयोग केला आहे. असे त्या म्हणाल्या.

12:06 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांवरील ही कारवाई अपेक्षित होतीच - माजी मंत्री छगन भुजबळ

राऊतांवर ही कारवाई अपेक्षित होतीच. एकदा ईडीचा तपास सुरु झाला की त्यांचे ऑफिस, घर चेक करतात. भुजबळ फार्मवर पण किती वेळा धाडी पडतात. मात्र, त्यांना अटक होईल का? त्याबाबत बोलू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

12:02 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांवर ईडीची कारवाई सूडबुद्धीने नाही - विनायक मेटे

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीची चौकशी होणं ही पहिली वेळ नाही. चौकशीत काहीतरी निष्पन्न झालं असेल त्यामुळे ईडीने पुन्हा चौकशी सुरू केलीय. आता या कारवाईत काय सापडतं त्यावर ईडीमार्फत कारवाई केली जाईल. त्यांच्यावर होत असलेली कारवाई ही सूडबुद्धीने नाही. याआधी देखील त्यांना बोलावलं होतं आता त्याची पुढची पायरी म्हणून ही चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी दिली आहे. ते बीड मध्ये बोलत होते.

11:56 (IST) 31 Jul 2022
संजय राऊत यांची सकाळ खराब झाल्याचे बघून समाधान मिळतंय - नितेश राणे

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने छापा टाकला. ईडीच्या या कारवाईनंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांना टोला खोचक लगावला आहे. “सगळ्यांची सकाळ खराब करणारे संजय राऊत यांची सकाळ खराब झाल्याचे बघून समाधान मिळतंय”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सविस्तर बातमी

Ed at Sanjay Raut Residence

ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. 'मी शिवसेना सोडणार नाही', असं ते म्हणाले. ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.