नगर: ओमान व दुबई या देशात अडीच ते तीन हजार महिला फसवणूक झाल्याने अडकल्या आहेत. मध्यस्थांनी त्यांच्याकडील मोबाईल व कागदपत्रे काढून घेतली आहेत. त्यांना परत भारतात आणण्यासाठी राज्य महिला आयोगाने प्रयत्न सुरू केले असून भारतीय दूतावासाकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर, सदस्यांसह आज मंगळवारी महिलांच्या तक्रारीची जनसुनावाणी घेण्यासाठी नगरमध्ये आल्या होत्या. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या वेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती भोर आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Efforts by the state women commission to rescue 3000 women who were cheated in oman dubai amy
First published on: 01-03-2023 at 00:19 IST