सावंतवाडी : नागपूरहून गोव्याला जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचा आंबोली घाटात अपघात झाला. आंबोली घाटातील नाना पाणी जवळच्या वळणावर गाडीचे ब्रेक फेल झाले आणि टेम्पो सुमारे सत्तर ते शंभर फूट खोल दरीत कोसळला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

​टेम्पो चालक सुमीत दत्ताजी ऊजवे (३४), जो नागपूरच्या माळा कॉलनी येथील रहिवासी आहे, याला किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

​हा टेम्पो पावडर घेऊन नागपूरहून गोव्याकडे जात होता. आंबोली रेस्क्यू ग्रुपचे संतोष पालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान झाले आहे.