Fire at Mumbai BMC School Kalachowki : काळाचौकी येथील साईबाबा नगरमध्ये आज भीषण आग लागली. साईबाबा नगरमधील साईबाबा शाळेत ८ सिलिंडरचे स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अनेक भागांत आगीच्या घटना वाढत आहेत. त्यातच, आज सकाळी काळाचौकी येथील साईबाब नगर परिसरात भीषण आग लागली. सात ते आठ सिलिंडरचे एकामागोमाग एक स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. येथे दाटीवाटीचा परिसर असल्याने आगीतून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या आहेत. दरम्यान, सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कोविड काळातील सिलिंडर, ऑक्सिजनचे सिलिंडरचे शाळेत गोडाऊन बनवलं होतं. त्यामुळे एका सिलिंडरचा स्फोट झाला. एका सिलिंडरच्या स्फोटामुळे इतर सिलिंडरचे स्फोट झाले”, अशी माहिती स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी दिली.