शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील आणि महसूल व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्यातील वादाने बुधवारी वेगळेच वळण घेतले असून खडसे यांनी पाटील यांच्या विरोधात येथील दिवाणी न्यायालयात पाच कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
पाटील यांनी विधानसभा अधिवेशन तसेच जिल्ह्य़ातील जाहीर सभांमधून खडसे यांच्यावर काही प्रकरणांमध्ये अनुदान लाटल्याचे आरोप केले आहेत. खडसे यांनी सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. सूत गिरणीसाठी १६१ कोटी रुपये अनुदान घेतले. परंतु, प्रत्यक्षात गिरणीला आतापर्यंत २० कोटी रुपये मिळाले आहेत. गिरणीचा प्रकल्प ५८ कोटी रुपयांचा असल्याची माहिती खडसे यांनी येथे दिली.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2015 रोजी प्रकाशित
गुलाबराव पाटील यांच्या विरोधात एकनाथ खडसेंचा मानहानीचा दावा
न्यायालयात पाच कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-12-2015 at 03:36 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse defamation claim against gulabrao patil