राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी भाजपाने माझ्यावर दबाव आणला, असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला. भाजपाला आलेला माज आणि मस्ती उतरवण्याची आता वेळ आली आहे, अशी शब्दांत एकनाथ खडसे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर होते. जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीरसभा पार पडली. या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपापले विचार मांडले. दरम्यान, या कार्यक्रमातून केलेल्या भाषणातून एकनाथ खडसे यांनी भाजपावर सडकून टीका केली.

हेही वाचा- “मराठा आंदोलकांवरील हल्ला फडणवीसांनीच घडवला”, माजी खासदाराचा खळबळजनक आरोप

भाजपाला उद्देशून केलेल्या भाषणात एकनाथ खडसे म्हणाले, “जळगाव जिल्ह्यात एका भ्रष्ट अधिकाऱ्यासाठी तुम्ही नाथाभाऊंविरोधात सर्व आमदार आणि खासदारांनी एकमताने ठराव केला. ज्याने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला, त्याच्यासाठी तुम्ही ठराव केला. पण या जिल्ह्यातील कापूस उत्पादकांसाठी तुम्ही ठराव करायला हवा. कापसाला भाव मिळाला पाहिजे, यासाठी तुम्ही एकमुखाने ठराव करावा.”

हेही वाचा- “नऊ वर्षांत मोदींनी एकच काम केलं, ते म्हणजे…”, शरद पवारांचं थेट विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हा माणूस भ्रष्ट आहे, हे मी पुराव्यानिशी विधानससेत दाखवलं होत. पण तुम्ही मंत्र्यावर दडपण आणून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करू दिली नाही. हे भ्रष्ट लोक आहेत. खोक्यावाले आहेत. आता खोक्यांचं राज्य सुरू केलंय. आता त्यांच्याकडे पैसा आलाय. माज आलाय. मस्ती आलीये. त्यांचा हा माज आणि मस्ती उतरण्याची आता वेळ आली आहे. ही मस्ती उतरवली पाहिजे. त्यासाठी आज शरद पवार याठिकाणी आलेत. आता तुमची जबाबदारी आहे, जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय झाला पाहिजे”, असंही एकनाथ खडसे म्हणाले.