Eknath Shinde Meeting with Amit Shah in Delhi Over Maharashtra Chief Minister Post : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १० दिवस उलटले तरी अद्याप राज्याला नवं सरकार लाभलेलं नाही. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला असून महायुतीने राज्यात तब्बल २३५ जागा जिंकल्या आहेत. मात्र महायुती अद्याप सरकार स्थापन करू शकलेली नाही. महायुतीत काही दिवस मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळालं. पाठोपाठ आता गृहमंत्रीपदावरून गोंधळ चालू आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्त्व करण्याची इच्छा होती. मात्र, भाजपाकडून नकार मिळाल्यानंतर शिंदे यांनी स्पष्ट केलं की भाजपा पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्रीपदासाठी ज्या नेत्याचं नाव जाहीर करतील मी त्याला पूर्ण पाठिंबा देईन. मात्र, शिंदे आता महायुतीच्या सरकारमध्ये ग़ृहमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. गृहमंत्रीपदामुळेच महायुतीच्या चर्चा लांबल्या असून शपथविधी रखडल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद व खातेवाटपासंदर्भातील चर्चेसाठी एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भाजपाकडे किमान सुरुवातीचे सहा महिने मुख्यमंत्रीपद दिलं जावं अशी मागणी केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या भेटीवेळी नव्या सरकारमध्ये सुरुवातीचे सहा महिने मुख्यमंत्रीपद मागितल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलं आहे. एका वरिष्ठ भाजपा नेत्याच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. मात्र भाजपाने ही मागणी तिथल्या तिथे फेटाळून लावली. असं केल्यास राजकारणात एक चुकीचं उदाहरण जाईल, असंही भाजपाने स्पष्ट केलं. सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याची व्यवस्था नाही, असा निर्णय घेतल्याने देशाच्या राजकारणात एक चुकीचं उदाहरण तयार होईल. त्याचबरोबर प्रशासनावर त्याचा विपरित परिणाम होईल, असं भाजपाने शिंदे यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं. भाजपा कार्यकर्त्यांनाही हे आवडणार नाही, असंही स्पष्ट केलं.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे ही वाचा >> Vijay Rupani : दिल्लीतून निरोप घेऊन निरीक्षक रुपाणी मुंबईत, मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचं नाव निश्चित झालंय का? म्हणाले…

…अन् शिंदे निरुत्तर झाले

दरम्यान, यावेळी भाजपाने शिंदे यांना विचारलं की सध्याच्या घडीला तुम्ही भाजपा अध्यक्षांच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? इतक्या मोठ्या संख्येने तुमचे आमदार निवडून आले असते तर तुम्ही मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला असता का? यावर शिंदे यांच्याकडे उत्तर नव्हतं असं भाजपा नेत्याने सांगितलं.

हे ही वाचा >> कलंकितांवरून कोंडी; शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे भाजपने ठरविण्यावर आक्षेप; राष्ट्रवादीसमोरही पेच

२३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीने बहुमत मिळवलं आहे. महायुतीला २८८ पैकी २३५ जागांवर विजय मिळाला आहे. तर, महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा जिंकता आल्या. महायुतीत भाजपाने १३२, शिवसेनेने (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) ४१ जागा जिंकल्या आहेत. तर मविआत शिवसेनेने (ठाकरे) २०, काँग्रेसने १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अवघ्या १० जागा जिंकल्या आहेत.

Story img Loader