एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. सध्या शिवसेना ही शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक अशा दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. या दोन्ही गटांत टोकाचा संघर्ष निर्माण झाला असून तो न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने या दोन्ही गटांमध्ये शिवसेनेवरील प्रभुत्व दाखवण्यासाठी चढाओढ लागली आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्याचे एक टीझर तसेच पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण तसेच शिवसेनेशी निगडित असलेल्या सर्व प्रतिमा, प्रतिकांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या पोस्टर्समध्ये नेहमी दाखवण्यात येणाऱ्या वाघाचे चित्रही शिंदे गटाने आपल्या पोस्टरमध्ये दाखवले आहे.

हेही वाचा >>> “भाजपाकडून पंकजा मुंडेंचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न”, मुंडेंच्या ‘बेरोजगार’ विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
ahmednagar lok sabha
विखे-पाटील यांच्या माफीनाम्यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम
Chavadi maharashtra political crisis maharashtra politics news maharashtra politics political chaos in maharashtra
चावडी : राज ठाकरे यांच्याकडे ‘शिवसेने’चे नेतृत्व?

उद्धव ठाकरे समर्थक आणि शिंदे गटातर्फे शिवसेनेचा वेगवेगळा दसरा मेळावा आयोजित केला जात आहे. शिंदे गटाने आपल्या दसरा मेळाव्याचे अधिकृत पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, तसेच शिवसेनेचा डरकाळी फोडणारा वाघ या प्रतिमांचा वापर केला आहे. या पोस्टरमध्ये ‘एक नेता एक पक्ष एक विचार एकलव्य एकनाथ,’ असा मजकूर लिहित आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला आहे.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंनी CM शिंदेंचं नेतृत्व मान्य करत जुळवून घ्यावं, कारण…”; शिंदे गटातील अब्दुल सत्तारांचा सल्ला

डरकाळी फोडणाऱ्या वाघाचा फोटो आणि शिवसेना यांच्यात विशेष नाते आहे. शिवसेना पक्षातर्फे या वाघाचा फोटो हमखास वापरला जातो. शिंदे गटाच्या पोस्टरमध्येही शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासोबतच डरकाळी फोडणाऱ्या वाघाचेही चित्र देण्यात आले आहे. सोबतीला बाळासाहेब ठाकरे यांचा तरुणपणातील फोटो घेण्यात आला असून, एक नेता एक पक्ष असे शिंदे गटाने म्हटले आहे. एकंदरीतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचा डरकाळी फोडणारा वाघ, शिवसेनेचे धनुष्यबाण, आनंद दिघे, अशी सर्वच प्रतिकं आणि चित्रे या पोस्टरमध्ये झळकली आहेत.

cm eknath shinde
शिंदे गटाने प्रदर्शित केलेले पोस्टर.

हेही वाचा >>> बाळासाहेबांचा आवाज, हिंदवी तोफ अन्…; CM शिंदेंनी शेअर केला स्वत:चा ‘एकलव्य’ असा उल्लेख ‘शिवसेना दसरा मेळाव्याचा’ टीझर

शिवसेना पक्षातर्फे मुंबईत दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत या मेळाव्याला विशेष महत्त्व होते. शिवसैनिक अजूनही या मेळाव्याकडे तेवढ्याच आत्मियतेने पाहतात. या मेळाव्यासाठी राज्याच्या वेगवेळ्या भागातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होत असतात. मात्र यावर्षी शिवसेनेचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे होणार असल्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत, हे दाखवण्यासाठी दोन्ही गटांत चढाओढ लागली आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. तर उद्धव ठाकरे समर्थकांचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर आयोजित केला जाणार आहे. जास्तीत जास्त गर्दी जममावी असे दोन्ही गटाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

हेही वाचा >>> सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी मास्टर प्लॅन काय? बारामतीतून भाजपा स्टार उमेदवार देणार? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

शिंदे गटाच्या टीझरचीही होतेय चर्चा

पोस्टरसोबतच शिंदे गटाने दसरा मेळाव्याची माहिती देणारे एक टीझरही प्रदर्शित केले आहे. या टीझरमध्येही छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या टीझरमध्ये बाळासाहेबांचा आवाज वापरण्यात आला आहे. तसेच डरकाळी फोडणाऱ्या वाघासोबत ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ लिहिलेला फोटोही वापरण्यात आला आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या या पोस्टर आणि टीझरची चांगलीच चर्चा होत आहे. तर उद्धव ठाकरे समर्थकांच्या पोस्टरमध्ये नेमकं काय असणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.