शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड करुन भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. २१ जून पासून सुरु झालेल्या या आरोप प्रत्यारोपांदरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अनेक बंडखोर आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेैच्या बंडखोरांवर टीका करताना राऊत यांनी वापरलेल्या शब्दांवरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील यांनी संजय राऊत यांच्याविरोधात आमदारांमध्ये एवढा रोष का आहे याबद्दल भाष्य केलंय.

नक्की वाचा >> भविष्यात शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील का?; शहाजीबापू म्हणाले, “उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य हे सर्व आमदारांच्या…”

संजय राऊतांविरोधात बंडखोर आमदारांमध्ये एवढा रोष का आहे असा प्रश्न शहाजीबापू यांना बीबीसी मराठीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शहाजीबापू यांनी प्रांजळपणे आपण राऊत यांच्या लिखाणाचे चाहते होतो आणि ‘रोखठोक’ हे सदर आवर्जून वाचायचो असं सांगितलं. “मला त्यांचं सदर आवडायचं. मात्र अलीकडे त्यांच्या वागण्यात अहंकाराचा दर्प येऊ लगला,” असं शहाजीबापूंनी राऊत यांच्यासंदर्भात म्हटलंय.

नक्की वाचा >> “…तर दीपक केसरकरांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत”; निलेश राणे शिंदे गटाच्या प्रवक्त्यांवर संतापले

तसेच पुढे बोलताना संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना शहाजीबापूंनी, “हा माणूस सकाळी १० वाजता बोलायला लागतो. सगळं वातावरण भडक करतात,” असा टोला लगावला. पुढे बोलताना, “या अशा वातावरणामध्ये कामं होत नाही,” असंही ते म्हणाले. यामधून त्यांनी बंडखोर आमदारांना राऊत यांच्याकडून होणाऱ्या टीकेचा त्रास होत असल्याचं सूचित केलं.

नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”

खरी शिवसेना कोणाची या वादावरही यावेळी शहाजीबापू यांनी भाष्य केलं. “आमच्या गटाकडे बहुमत आहे. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी सर्वाधिक आमदार आमच्या गटात आहेत. निर्णय घेताना याचा विचार विधानसभेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय नक्की करेल,” असा विश्वास शहाजीबापू यांनी व्यक्त केलाय. तसेच पुढे बोलताना, “आम्ही कालही शिवसेनेत होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार,” असंही शहाजीबापू म्हणालेत.

नक्की वाचा >> ‘जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवार होते’ म्हणणाऱ्या केसरकरांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “२०१४ ला मीच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमचीच शिवसेना खरी असल्याचं आम्ही मानतो, असं सांगतानाच पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील जनता शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.