Maharashtra Political Crisis, Eknath Shinde Oath Ceremony : उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सर्व तर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील असं जाहीर केलं आहे. आज संध्याकळी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

हेही वाचा>>> आज फडणवीस, एकनाथ शिंदेंचा शपथविधी, पण विरोधी पक्षनेता कोण? रोहित पवार यांनी सांगितलं, म्हणाले…

“आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजप आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केली आहे, आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे. भाजपा शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचच शपधविधी होईल,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा >>> “संजय राऊत स्वतः शिवसेनेत, मात्र निम्मं काम राष्ट्रवादीचं करतात”; दीपक केसरकरांचा गंभीर आरोप

” लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. या विस्तारात शिंदे यांच्यासोबत असलेले, अपक्ष आणि भाजपाचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील. मी स्वत: बाहेर असेन. पण हे सरकार पूर्ण, व्यवस्थित चालले पाहिजे ही जाबाबदारी माझीदेखील असेल. त्यासाठी पूर्ण साथ आणि समर्थन मी या सरकारला देणार,” अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> “मी सरकारच्या बाहेर राहून…”; एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री असल्याच जाहीर करताना देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच वर्षांच्या आमच्या कार्यकाळात राज्याचा जो विकास झाला तो गेल्या अडीच वर्षात पूर्णपणे संपला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मेट्रो असेल, वेगवेगळे प्रकल्प असतील किंवा ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न असेल हा विषय असेल. मराठा आरक्षणापासून ते सर्व विषय हे आका निश्चित टप्प्यापर्यंत जातील. दुर्बल घटकांना न्याय देण्याचा हे सरकार प्रयत्न करेन, असा मला विश्वास आहे.