सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सांगली महापालिकेचे माजी नगरसेवक विष्णू माने यांची निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते माने यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

मुंबई येथे ही निवड पार पडली. यावेळी आ. शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगली विधानसभा अध्यक्ष बिरेंद्र थोरात, सागर शिंनगारे आदी उपस्थित होते. ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष विष्णू माने यांची निवड करण्यात आली आहे. सांगलीत ओबीसी मेळावा घेण्यात आला होता. याचे संयोजन विष्णू माने यांनी केले होते. शिवाय शहरातील अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या उभारणीत देखील त्यांचा सहभाग आहे.

हेही वाचा – Ramdas Athawale : “…तर माझ्याऐवजी प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”, रामदास आठवलेंचं वक्तव्य; म्हणाले, “मी स्वतःच…”

हेही वाचा – रत्नागिरी : कोकण विकासासाठी समृद्ध कोकण संघटना स्वराज्यभूमीचे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडीनंतर माने म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी प्रदेशवर काम करण्याची संधी दिली आहे. या संधीच्या माध्यमातून राज्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. पक्षाची सर्व ध्येय, धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.