कराड : कोल्हापूर येथील नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीला गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आले. या हत्तीला पुन्हा आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर व कोल्हापूरकरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी कराडमध्ये सुद्धा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
शिवतीर्थ दत्त चौकात महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी कराडकरही एकवटले. येथील फलकावर कराडकरांनी स्वाक्षरी करून कोल्हापूरकरांच्या मागणीला उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त केला. कोल्हापूर येथील नांदणी मठातील महादेवी हत्तीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप ‘पेटा’ने केला. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या हत्तीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्ती वनताराकडे सोपवण्यात आली. गेल्या ३५ वर्षांपासून महादेवी आणि कोल्हापूरकरांचा एक जिव्हाळ्याचा ऋणानुबंध निर्माण झाला. महादेवी ही केवळ हत्तीण नसून, नांदणीची लेक आहे, असे मानून कोल्हापूरकर हत्तीणीची सेवा करत होते. त्यामुळे महादेवी हत्तीणीला नांदणी मठाकडे परत पाठवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवल्यानंतर कराडमध्ये देखील कोल्हापूरकरांच्या मागणीला पाठिंबा देत स्वाक्षऱ्यांची मोहीम राबविण्यात आली. यावेळी कराडकरांचा मोठा प्रतिसाद या मोहिमेला मिळाल्याचे दिसले.
कोल्हापूर येथील नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीला गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आले. या हत्तीला पुन्हा आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर व कोल्हापूरकरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी कराडमध्ये सुद्धा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
दरम्यान, कोल्हापूर येथील नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीला गुजरातच्या वनतारामध्ये परत स्वगृही आणण्यासाठी लोकांच्या सर्वत्र तीव्र भावना दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी सुविचार फलकांवर तशा तीव्र भावना व्यक्त करण्यात आहेत. कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर व कोल्हापूरकरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी कराडमध्येही घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद लाभताना ‘महादेवी’च्या पुनरागमनासाठी लोक आग्रही दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यात अबालवृद्धांचा सहभाग आहे. अनेक समाजमाध्यम समूहांवर सुध्दा नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्ती गुजरातच्या वनतारामधून परत आणली जावी आणि लोकाग्रहाचा आणि जनभावनांचा सरकारने आदर राखावा अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.