कर्जतः शहरातील हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमणे आज, सोमवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली. नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागाने यासाठी संयुक्त मोहीम राबवली. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

तत्पूर्वी भूमी अभिलेख अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अतिक्रमणाची आखणी केली. त्यानंतर जेसीबीने अतिक्रमण काढण्यात आली. तत्पूर्वी प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस देण्याची आवश्यकता होती. मात्र, नोटिसा मिळाल्या नसल्याची तक्रार अतिक्रमणधारकांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिक्रमण काढावेत यासाठी अखंड हिंदू समाजाच्या वतीने कर्जत बंद, रास्ता रोको, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आदी मार्गाने आंदोलने करण्यात आली. मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर यांनीही अतिक्रमणे हटवण्यासाठी कर्जतमध्ये आंदोलने केली.