महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या, सत्तारुढ पक्षांच्या विरुद्ध एक अक्षर जरी बोललो तरी तुम्हाला पाच दहा ठिकाणच्या जेलमध्ये जावं लागतं. पण देशाच्या पंतप्रधानांबद्दल कोणतीही भाषा वापरली तरी अशी भाषा वापऱ्यांचे महाराष्ट्रामध्ये स्वागत केलं जातं, असा टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

तसेच कुणी हनुमान चलिसा पठण करत असेल तर रोखता येत नाही. कोणी जर रोखत असेल तर ते चुकीचे आहे. पण भारतात, महाराष्ट्र वा नागपूरमध्ये हनुमान चालीसावर कोणीही बंदी लावू शकत नाही. त्यामुळे या संदर्भात राजकारण करण्याचे काम नाही. ज्यांना हनुमान चालीसा पठण करायचे आहे त्यांना करू द्या असे मत नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

राणा दांपत्याचे समर्थनात लागलेल्या फलकावर भाजपाच्या मोठ्या नेत्यांचे छायाचित्र दिसून आले यावर विचारले असता, फलक जर सकारात्मक आहे काही हरकत नाही. मात्र नकारात्मक फलकवार छायाचित्र लावू नका अशी विनंती केली असल्याचेही ते म्हणाले.

“भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा नागपूरमध्ये कुठेही हनुमान चालिसा म्हणण्यावर बंदी नाही. कोणी हनुमान चालिसा म्हणण्याला विरोध करत असेल तर ते अतिशय अयोग्य आहे. सगळ्यांनी योग्य भाषेचा वापर केला पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून केंद्र सरकारला मसणात जावं लागेल असे म्हटल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. “महाराष्ट्रामध्ये आता कायदा असा आहे की, मुख्यमंत्र्यांच्या, सत्तारुढ पक्षांच्या विरुद्ध एक अक्षर जरी बोललो तरी तुम्हाला पाच दहा ठिकाणच्या जेलमध्ये जावं लागतं. पण देशाच्या पंतप्रधानांबद्दल कोणतीही भाषा वापरली तरी अशी भाषा वापऱ्यांचे महाराष्ट्रामध्ये स्वागत केलं जातं. हीच परंपरा महाराष्ट्राने कायम केली आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.