विधानसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास उरले असून सोमवारी सायंकाळी जाहीर झालेल्या एग्झिट पोलमुळे राजकारण पुन्हा तापले. या एक्झिट पोलमुळे राज्यासह नांदेडमधील भाजप व शिवसेनेचे कार्यकत्रे सध्या उत्साहात असून विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे काँग्रेस मात्र अजूनही आशावादी आहे. सरकार विरोधातील रोष निश्चितच प्रगट होईल, अशी आशा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. जिल्ह्यतील नऊ विधानसभा मतदारसंघातील १३४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणारे आकडे मतदान यंत्रातून आज गुरुवारी बाहेर पडणार आहेत, त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गावागावांतील जातीय समीकरण आणि कोणता उमेदवार कुठे अधिक चालला यावरून काथ्याकूट केले जात आहेत. विजयावरून अनेकांनी पजाही लावल्या आहेत. निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचे समीकरण मांडण्यात मोठी चुरस दिसत आहे. बेरीज, वजाबाकीच्या समीकरणातून कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपलाच उमेदवार विजयी होणार असे गणितही मांडले आहे.

नांदेड जिल्ह्यतील नऊही मतदारसंघात बहुरंगी लढती झाल्या. त्यामुळे पक्षांचे नेते आणि कार्यकत्रे विजयाचे दावे करत आहेत. त्यामुळे निवडणूक िरगणातील उमेदवारासोबतच विजयाचे समीकरण मांडणाऱ्या कार्यकर्त्यांचे ठोके वाढले आहेत. प्रत्येक जण विजयाचे दावे करीत असला, तरी ठामपणे कोणीही निकालाची खात्री देताना दिसत नाही.

किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नायगाव, देगलूर, मुखेड व लोहा या आठ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. नांदेड दक्षिणमध्ये सर्वाधिक ३८ उमेदवार िरगणात असल्याने या मतदारसंघात तीन ईव्हीएम मशीनवर मतदान झाले. त्यामुळे उमेदवारांची संख्या लक्षात घेता २० टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे.

जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांसह एकूण १३४ उमेदवार िरगणात आहेत. यासाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले. एकूण ६७.३७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान भोकर तर सर्वात कमी मतदान नांदेड उत्तरमध्ये झाले. प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन टेबलवर टपाली मतदानाची मतमोजणी होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exit poll vidhan sabha election akp
First published on: 24-10-2019 at 02:55 IST