भारताचं परराष्ट्र धोरण हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. एवढंच नाही तर काश्मीर प्रश्न, भारत-अमेरिका परस्पर संबंध, भारत-पाक संबंध, भारत-चीन संबंध, पाकिस्तानच्या कुरापती हे सगळे विषयही कायम चर्चिले गेले आहेत. सध्या जगाला ग्रासलंय ते करोनाच्या संकटाने. हा करोना ज्या चीनने आणला त्या चीनमध्ये सगळं काही बरं चाललंय. मात्र जगातून करोना हे संकट दूर झालेलं नाही. करोनानंतरचं जग कसं असेल हाही विषय चर्चिला जातो आहे. या सगळ्या विषयांचा गाढा अभ्यास असलेलं एक नाव म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंटरनॅशल स्टडीज या विषयावर त्यांनी पीएचडीही केली आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातूनही त्यांनी शिक्षण घेतलं आहे. अशा शैलेंद्र देवळाणकरांना प्रश्न विचारण्याची संधी लोकसत्ता तुम्हाला देतं आहे. बुधवार दिनांक १७ जून रोजी सकाळी अकरा वाजता शैलेंद्र देवळाणकर हे लोकसत्ता डिजिटल अड्डावर येत आहेत. लोकसत्ता लाइव्ह या फेसबुकपेजवर ते लाइव्ह असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन त्यांना प्रश्न विचारु शकता. तेव्हा परराष्ट्र धोरणाबाबत, आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल एकंदरीत सध्याच्या परिस्थितीबाबत तुम्ही त्यांना प्रश्न विचारु शकता लोकसत्ता डिजिटल अड्डावर-

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expert in international affairs shailendra deolankar on loksatta digital adda watch his interview on facebook live scj
First published on: 16-06-2020 at 11:25 IST