अहिल्यानगर : समृद्धी महामार्गावर सर्वांत मोठी बाजार समिती निर्माण केली जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्याजवळ ती असेल. त्यामुळे अहिल्यानगर बाजार समितीलाही शेतीमाल निर्यात सुविधा उपलब्ध केल्या जातील. जिल्ह्यातील संत्री उत्पादकांना निर्यात प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्याचा खर्च सरकार करेल, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नगरमध्ये बोलताना सांगितले. नगर बाजार समितीला सुमारे १.५ कोटी रुपये खर्चाचे संत तुकडोजी महाराज शेतकरी निवास मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिचोंडी पाटील उपबाजारचे भूमिपूजन आज पणनमंत्री रावल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी सभापती भानुदास कोतकर, अक्षय कर्डिले, सभापती भाऊसाहेब बोठे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रावसाहेब शेळके जिल्हा परिषद माजी सदस्य सचिन जगताप उपसभापती रभाजी सुळ सचिव अभय भिसे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून परिचित असणारे बराच काळ राज्याचे मुख्यमंत्री राहिले. परंतु, त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेतले? पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना केंद्रीभूत ठेवून निर्णय घेत आहेत. त्यातून अर्थव्यवस्था मजबूत होईल. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार कर्डिले यांनी नगर बाजार समितीने यापूर्वी नियुक्ती येथे उपबाजार सुरू केला आताची चोंडी पाटील येथे सुरू करण्यात आला आहे चिचोंडी पाटील येथे जनावरांचा बाजार भरवला जाईल नंतर कांदा मार्केट ही सुरू केले जाईल अशी माहिती दिली.

भाजयूमोचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी मंत्री पाचपुते यांची भाषणे झाली. विजय साबळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नगर तालुक्यातील बचत गटांच्या महिलांना मंत्री राहुल मंत्री विखे यांच्या हस्ते कर्ज वितरणाचे धनादेश वितरित करण्यात आले. चिचोंडी पाटील येथील उपबाजारामुळे नगर तालुक्यासह आष्टी, जामखेड भागातील शेतकऱ्यांची चांगली सोय होणार आहे यासाठी आमदार कर्डिले यांनी पाठपुरावा केला होता.