या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली जिल्ह्यत अवकाळी पावसाने खरिपाच्या पिकाबरोबरच बागायती पिकांचे प्रचंड नुकसान केले असले, तरी जमिनीतील पाणीपातळी तब्बल ५८ सेंटीमीटरने वाढली आहे. यामुळे किमान मार्च महिन्यापर्यंत जिल्ह्य़ातील एकाही गावात पाणीटंचाईची शक्यता धूसर असल्याचे भूजल सव्‍‌र्हेक्षणच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

स्थिर भूजल पातळीच्या नोंदी घेण्यासाठी ८६ निरीक्षण विहिरी निश्चित केलेल्या आहेत. ऑक्टोबर २०१९ मधील निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीचा मागील पाच वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये मागील पाच वर्षांची सरासरी भूजल पातळी ४.२७ मी. होती.  ऑक्टोबर २०१९ मध्ये  त्यामध्ये ५८ सें.मी. ची वाढ होऊन स्थिर भूजल पातळी ३.७० मी. झाली आहे. यात जिल्ह्यतील एकूण ८६ निरीक्षण विहिरींपैकी ५२ विहिरीमधील भूजल पातळीमध्ये सरासरीपेक्षा वाढ झालेली असून ३४ निरीक्षण विहिरींमधील भूजल पातळीमध्ये सरासरीच्या तुलनेत घट आढळून आलेली आहे.

ऑक्टोबर अखेर प्रत्यक्षात झालेल्या तालुकानिहाय पर्जन्यमानाचा ऑक्टोबर अखेरीस तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमानासोबत तुलात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार सरासरीच्या तुलनेत सर्वच १० तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याचे आढळून येते. पर्जन्यमान व निरीक्षण विहिरीतील स्थिर भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास केला असता अवर्षण प्रवण व शाश्वत पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत चालू वर्षांत वाढ दिसून येते. त्यामुळे सांगली जिल्ह्यतील २०१९-२० या कालावधीकरिता संभाव्य पाणीटंचाई असलेल्या गावांची संख्या निरंक आहे. अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सांगली यांच्यातर्फे देण्यात आली.

तालुकानिहाय मागील ५ वर्षांची सरासरी भूजल पातळी व कंसात ऑक्टोबर २०१९ ची स्थिर भूजल पातळी अनुक्रमे मीटरमध्ये पुढीलप्रमाणे.  खानापूर – ५.१९ मी. (३.३० मी.) यामध्ये १.८९ मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे. कडेगाव – ४.९५ मी. (४.४० मी.) यामध्ये ५५ सें.मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे. तासगाव – ६.७४ मी. (५.९७ मी.) यामध्ये ७७ सेंमी. भूजल पातळीत वाढ झाली आहे. पलूस – ३.६९ मी. (२.१० मी.) यामध्ये १.५९ मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे. शिराळा – १.५२ मी. (०.६७ मी.) यामध्ये ८५ सें.मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे. कवठेमहांकाळ – ४.९५ मी. (४.९९ मी.) यामध्ये ४ सें.मी. भूजल पातळीत घट झाली आहे, जत – ५.४३ मी. (६.४४ मी.) यामध्ये १ मी. भूजल पातळीत घट झाली आहे, मिरज – ३.०८ मी. (२.२२ मी.) यामध्ये ८६ सें.मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे, वाळवा – २.०५ मी. (२.०३ मी.) यामध्ये २ सें.मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे, आटपाडी – ५.१४ मी. (४.८३ मी.) यामध्ये ३१ सें.मी. भूजल पातळीत वाढ झाली आहे.ह्ण ’ ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये जिल्ह्यत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता वाटत नाही. तथापि स्थानिक परिस्थितीचा विचार करून टंचाई भासण्याची शक्यता असलेल्या तीन तालुक्यांचा समावेश एप्रिल २०२० ते जून २०२० कालावधीमध्ये करून त्यानुसार जिल्ह्यचा टंचाई अहवाल तयार करण्यात आल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने  म्हटले आहे. स्थानिक परिस्थितीनुसार संभाव्य टंचाई भासणारी एकूण ७३ गावे असून गावांची तालुकानिहाय संख्या : कवठेमहांकाळ – ४, जत – ५६ व आटपाडी – १३.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extremely severe damage to horticultural crops a horticultural crops akp
First published on: 21-11-2019 at 01:42 IST