शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने पिकविमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला आहे. पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करत शिवसेनेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील मोर्चामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तेही या मोर्चात सहभागी झाले आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही शिवसेनेची नौटंकी असल्याची टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, “शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून विमा कंपन्यासोबत करार केला आहे. अधिकाऱ्यांनी अहवाल तयार केले तेव्हा शिवसेना झोपा काढत होती का ?”. मी दोन वर्षांपुर्वी मुख्यमंत्र्यांना पुरावे दिले होते अशी माहिती यावेळी राजू शेट्टी यांनी दिली.

याआधीही राजू शेट्टी यांनी टीका करताना एकीकडे सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करतो ही नाटकं करायची. शिवसेनेचा हा दुटप्पीपणा संपूर्ण महाराष्ट्राला समजलेला आहे असं म्हटलं होतं.

उद्धव ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा करताना सगळ्या कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावं बँकांनी लावली पाहिजेच अशी मागणी केली होती. काही ठिकाणी कर्जमाफीचं प्रमाणपत्र दिलं गेलं मात्र कर्जमाफी झालीच नाही. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी ही मागणी आम्ही केली आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्याच पाहिजेत. झारीतले शुक्राचार्य कुणी असतील तर त्यांचा बंदोबस्त केला जाईल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. शेतकऱ्यांना जर कुणी नाडले तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer leader raju shetty on shivsena uddhav thackeray protest against insurance company sgy
First published on: 17-07-2019 at 12:59 IST