लोहारा तालुक्यातील मोघा (खुर्द) येथील नुकसानग्रस्त वृद्ध शेतकऱ्याची अतिवृष्टीमुळे झालेली परवड ‘लोकसत्ता’ने ठळकपणे प्रकाशित केली. या वृत्ताची दखल घेत सामाजिक कार्यकत्रे विनायक पाटील यांनी आठ हजार रुपयांची मदत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परतीच्या पावसामुळे लोहारा तालुक्यातील खरीप पिकांची मोठी हानी झाली आहे. ज्यांची केवळ शेतीवर उपजीविका भागवली जाते, अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. तालुक्यातील मोघा (खुर्द ) येथील शेतकरी तुकाराम भोंडवे यांच्या तीन एकरवरील सोयाबीन व दोन एकरावरील ऊस, कांदा पिकांची प्रचंड नासाडी झाली. भोंडवे यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. त्यांना सहा मुली आहेत. पकी चार मुलींचे लग्न कर्ज काढून केले आहेत. तर दोन मुली उपवर  आहेत. त्यातील एक दिव्यांग आहे. यंदा खरिपातील मिळणाऱ्या उत्पन्नातून मुलींच्या लग्नाचा बेत आखला होता. परंतु परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकलेले नाही. घेतलेले कर्ज फेडायचे कसे आणि मुलींचे लग्न करायचे कसे, या विवंचनेने ते हतबल झाले होते. ‘लोकसत्ता’ने तुकाराम भोंडवे या शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. या वृत्ताची दखल घेत न खचता संकटाला धर्याने सामोरे गेले पाहिजे, मुलीच्या लग्नाची चिंता करू नका. वेळप्रसंगी मुलीच्या लग्नासाठीही मदत करू, असे सांगत विनायक पाटील यांनी तातडीची आठ हजार रुपयांची मदत केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer loksatta endangered akp
First published on: 22-11-2019 at 04:15 IST