वाई:धोम  धरणाच्या आसरे बोगदा कालव्याच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू झाला. आंबेदरा आसरे (ता वाई)येथेही दुर्दैवी घटना घडली.उत्तम सहदेव ढवळे  व अभिजीत उत्तम ढवळे अशी त्यांची नावे आहेत.  धोम धरणातून  भोर खंडाळा फलटण तालुक्याला बलकवडी धरणाच्या आसरे गावाजवळच्या बोगद्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. सध्या कालवा बंद आहे त्यामुळे येथे गेट टाकलेले आहे.त्यामुळे येथे पाणी साठलेले असते.या कालव्याच्या पाण्यात दुपारी  पोहण्यासाठी उत्तम सहदेव ढवळे (वय ४५) व अभिजीत उत्तम ढवळे (वय १३) हे दोघे  पितापुत्र गेले होते. यावेळी कालव्याच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. 

हेही वाचा >>> सोलापूरची वाटचाल ‘शोला’पूरकडे..

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father and son drown in dhom dam in wai zws
First published on: 02-04-2024 at 20:16 IST