औरंगाबादमधल्या करमाड भागात १३ वर्षांच्या मुलाची डोक्यात गज घालून हत्या करणाऱ्या त्याच्या बापाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रभूसिंग बैनाडे असे या आरोपीचे नाव आहे. मुलाची हत्या केल्यावर प्रभूसिंग डोंगरामधल्या कपारीत लपून बसला होता. याबाबत एका गुराख्याने पोलिसांना माहिती दिली. ज्यानंतर पोलिसांनी प्रभूसिंग बैनाडेला डोंगरावर जाऊन अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबादच्या करमाड भागात एका १३ वर्षांच्या मुलाच्या डोक्यात गज मारण्यात आला. त्यानंतर या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  त्यासंदर्भात पोलीस तपास करत होते. या मुलाची हत्या झाल्याचे निदर्शनास आले होते. आता याप्रकरणी प्रभूसिंग बैनाडेला म्हणजेच खून झालेल्या मुलाच्या बापाला अटक करण्यात आली आहे. त्याने हा खून का केला यासंबंधी आता पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

मुलगा गेल्या एक वर्षांपासून वडिलांच्या अनैतिक संबंधावर लक्ष ठेवून होता. यामुळे शेतमजूर असणाऱ्या वडिलांनी डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करत मुलाची हत्या केली. हल्ल्यात लहान मुलगा जखमी झाला आहे. पोलीस अधीक्षक आरतीसिंग यांनी घाटी रुग्णालयात भेट देत प्रकरणाची माहिती घेतली. करमाड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आता याप्रकरणी या मुलाच्या बापाला अटक करण्यात आली आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father arrested for murder of his 13 year old son from aurnagabad
First published on: 04-01-2019 at 21:11 IST