वसई-विरारमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पहिला बळी घेतला आहे. वसईच्या वळीव परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणाचा नाल्यात पडून मृत्यू झाला असून वालीव पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

अग्निशमन विभागाने माहिती दिली की, त्यांना वसई पूर्वच्या मधुबन परिसरात एका नाल्याशेजारी मृतदेह आढळून आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात वालीव पोलिसांनी माहिती दिली की, हा मृतदेह राहुल नंदाला विश्वकर्मा याचा असून तो वसईच्या गावराई परिसरात राहत होता. सोमवारी तो वसईच्या कंपनीत कामावर गेला होता. मात्र कामावरून घरी येताना तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर काल (बुधवार) दुपारी मधुबन परिसरातील नाल्याजवळ त्याचा मृतदेह वाहत आला आणि अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह पुराच्या पाण्यात वाहत आला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.