रत्नागिरी :  दापोली तालुक्यातील लाडघर-बुरोंडी समुद्रामध्ये  एल.ई.डी. लाईट वापरणाऱ्या नौकेवर मत्स्य विभागाने कारवाई केली. या नौकेवर तांडेलसह ४ खलाशांना  ताब्यात घेत नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी  दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) व स्वप्निल चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) हे स्थानिक लोकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गस्त घालत होते.

यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली यासिन अब्दुल गफूर मुकादम, रा. खडप मोहल्ला, रत्नागिरी यांची नौका अब्दुल गफूर (नों. क्र. आयएनडी- एम एच -४ एमएम ६००७) द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात लाडघर-बुरोंडी समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट वापरत असल्याचे निदर्शनास आले. ही बोट मत्स्य विभागाने पकडून  या नौकेवरील नौका तांडेलसह ४  खलाशांना  ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. ही नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नौकेवर मासळी आढळून आलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.  ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी सागर कुवेसकर व मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, रत्नागिरी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी  दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) व  स्वप्निल चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दाभोळ  प्रशांत येलवे, सागरी सुरक्षा रक्षक  योगेश तोस्कर,  राजन शिंदे,  मंदार साळवी व गस्ती नौका रामभद्रा वरील कर्मचारी ज्ञानेश्वर अजगोलकर,  विशाल यादव,  शिवकुमार सिंग यांचे सहकार्याने करण्यात आली आहे.